शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, लष्करातील हमालाचा मृत्यू

By admin | Updated: May 28, 2017 17:08 IST

पाकिस्तानकडून केरन सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात एका लष्करातील हमालाचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. 28 - पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानकडून केरन सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात एका लष्करातील हमालाचा मृत्यू झाला असून, आणखी एक नागरिक जखमी झाला आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी केरन सेक्टरमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. त्यात एका लष्कराच्या हमालाचा मृत्यू झाला. त्या हमालाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला आहे. तर जखमीवर उपचार सुरू आहेत.गेल्या काही तासांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये घुसखोरी करणा-यालाही भारतीय सैन्यानं ठार केलं आहे. रविवारी पहाटे 2.30 वाजता ही कारवाई करण्यात आली होती.  घुसखोर करणारी एक व्यक्ती ठार झाल्याचे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले होतं. त्रालमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा लष्कराच्या गस्तीपथकावर हल्ला करणारे दोन दहशतवादीही चकमकीमध्ये ठार झाले होते. साईमुह गावात लष्कराच्या गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. हा हल्ला होताच, जवानांनी लगेचच येथील परिसराला घेराव घालून त्यांचा शोध सुरू केला होता. त्या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले होते.

(हिजबुल कमांडरसह १० दहशतवादी ठार)तत्पूर्वी काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये १0 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर आणि गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बुरहान वनीचा वारसदार सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला आहे. बुरहाननंतर सबजार भट्ट दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळत होता. त्राल येथे करण्यात आलेल्या कारवाईत सबजार आणि त्याचा साथीदार मारला गेला.सबजार भट्ट मारला गेल्याचे वृत्त पसरताच, काश्मीरच्या अनेक भागांत तणाव निर्माण झाला आहे. किमान ५0 ठिकाणी दगडफेक सुरू झाली. हिंसाचारामुळे बऱ्याच भागांमध्ये बंदसदृष्य वातावरण असून, कुलगाम, पुलवामा आणि शोपियन या भागांत सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत