शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरीच्या प्रयत्नात पाकिस्तानचे होतेय जबर नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 14:34 IST

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. पण यामध्ये मोठया प्रमाणावर त्यांचे दहशतवादी मारले जात आहेत.

ठळक मुद्देसीमेवर भारतीय लष्कराने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले. सुरक्षापथकांनी घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले.

नवी दिल्ली, दि. 4 -जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. पण यामध्ये मोठया प्रमाणावर त्यांचे दहशतवादी मारले जात आहेत अशी माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. पाकिस्तानला लागून असणआ-या सीमेवर भारतीय लष्कराने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले असून, घुसखोरी रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली आहेत असे अरुण जेटली यांनी सांगितले. 

पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत असे त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना सांगितले. सर्तक असलेल्या सुरक्षापथकांनी घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले असून, दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे असे जेटली म्हणाले. नियंत्रण रेषेवर यावर्षात पाकिस्तानने आतापर्यंत 285 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 2016 च्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. त्यावर्षी पाकिस्तानने वर्षभरात 228 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. 

आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून 221 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. इथे सीमा सुरक्षा दल आणि लष्कर तैनात असते. लष्कराने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर AIOS म्हणजे घुसखोरी रोखणारी सिस्टिम तयार केली आहे असे जेटलींनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी रडार, सेन्सर्स आणि थर्मल इमेजर्सच्या मदतीने टेहळणी सुरु असते अशी माहिती त्यांनी दिली. 

अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याचा एन्काऊंटरजम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले. ठार करण्यात आलेला दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली.  मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले.