शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गयावया करणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा मस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:51 IST

भारताचे जोरदार उत्तर; काही पाकिस्तानी रेंजर्स ठार, चौक्याही केल्या उद्ध्वस्त

जम्मू : काश्मीरच्या नागरी वस्त्यांवर व लष्करी चौक्यांवर तीन दिवस पाकिस्तानला भारताने सडेतोड उत्तर दिल्यानंतर घाबरून जाऊन, आता आमच्यावरील हल्ले थांबवा, अशी गयावया करणाºया पाक सैन्याची खुमखुमी अद्याप संपलेली नाही. गोळीबार थांबवण्याची विनवणी बीएसएफला करणाºया पाकिस्तानी रेंजर्सनी पुन्हा भारतीय नागरी वस्त्यांमध्ये तोफांचा मारा व गोळीबार सुरू केला असून, त्यात काही रहिवासी जखमी झाले आहेत.अर्थातच भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी रेंजर्सचे ४ ते ६ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानने त्याला दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानातील अनेक लष्करी चौक्या भारतीय जवानाने पार नष्ट करून टाकल्या आहेत.अरनियातीर त्रेवा गावाला पाकिस्तानी रेंजर्सनी लक्ष्य केले. तिथे सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काल पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार थांबवा, अशी गयावया केल्यानंतर बीएसएफने सीमारेषेवर गोळीबार बंद केला होता. पण त्यानंतर काही तासांतच पाकने आपला खरा चेहरा दाखवला व प्रामुख्याने भारतातील नागरी वस्त्या व गावांवर हल्ले सुरू केले. पाकने रविवारी जम्मूतील सांबा सेक्टरच्या बाबा चमिलियाल तसेच नारायणपुरा भागातून जाणाºया आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ गोळीबार केला.सध्या पाककडून तोफांचा मारा सुरू आहे. त्यामुळे त्याच भाषेत भारतीय जवानही त्यांना उत्तर देत आहेत. त्यात पाकिस्तानचे ४ ते सहा सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच पाक लष्कराच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. शाळा बंद, लोक घराच्या आतपाकने आपला नापाक चेहरा दाखवत असून, गोळीबार व तोफांचा मारा थांबवायला तयार नाही. त्यामुळे बीएसएफ व स्थानिक पोलिसांनी ग्रामस्थांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. ंशिवाय त्या परिसरातील शाळादेखील बंद ठेवल्या आहेत.पोलीस चौकीवर हल्लापाकिस्तानच्या कागाळ्या सुरू असतानाच काश्मीर खोºयातील पुलवामा जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर काही अतिरेक्यांनी सोमवारी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना लगेच गोळीबाराने उत्तर दिले. अतिरेकी पळून गेले असून, त्यांचा शोध जारी आहे. या हल्ल्यात कसलेही नुकसान झालेले नाही.

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन