शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मुत्सद्दीपणामुळे १९७१ युद्धात पाकची हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 3:10 AM

मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, निर्णयक्षमता व कूटनीती या बाबी परराष्ट्र धोरण राबविताना महत्त्वाच्या असतात. त्यांचा मेळ घालून १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात दक्षिण आशिया खंडाचा नकाशा इंदिरा गांधी यांनी बदलला.

- दत्तात्रय शेकटकर(निवृत्त लेफ्टनंट जनरल)मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, निर्णयक्षमता व कूटनीती या बाबी परराष्ट्र धोरण राबविताना महत्त्वाच्या असतात. त्यांचा मेळ घालून १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात दक्षिण आशिया खंडाचा नकाशा इंदिरा गांधी यांनी बदलला. बांगलादेशाची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर त्यांनी आखलेल्या मुत्सद्दी धोरणामुळेच १४ दिवसांत भारताने पाकिस्तानला नमवले.मी १९६३मध्ये लष्करी सेवेत रुजू झालो. त्या वेळी नेहरू पंतप्रधान होते. स्वातंत्र्यलढ्यातील कठीण प्रसंग इंदिराजींनी पाहिले होते; त्यांना स्वातंत्र्याची जाणीव होती. नेहरूंचे संस्कार असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर बनले. त्या अनुभवाचा वापर त्यांनी भारताचे संरक्षण, प्रगती व विकासासाठी केला.पश्चिम पाकिस्तान पूर्वेकडील बंगाली जनतेवर अन्याय करीत होता. तेथील नागरिकांना हक्क मिळावेत, याचा निर्धार इंदिरा गांधी यांनी केला. देश चालवायचा असेल, तर राष्ट्रनीती व आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास करावा लागतो. इंदिरा गांधींमध्ये हे गुण होते. त्यांनी पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले. मुक्ती वाहिनीच्या आंदोलकांना प्रशिक्षित करण्याचे काम भारतीय गुप्तचर संस्थांनी सुरू केले. त्यात माझाही सहभाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी पाकविरोधी आघाडी सुरू केली. अमेरिका, सोव्हिएत रशिया, फ्रान्स, ब्रिटन या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी त्यांनी घेतल्या व पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले.भारताशी पाकिस्तान युद्ध करेल, याचे संकेत मिळाले होते. मे-जूनच्या सुमारास युद्ध होईल, अशी शक्यता होती. ते भारताच्या हिताचे नव्हते. भौगोलिक व आंतरराष्ट्रीय स्तराबरोबरच हवामान योग्य नव्हते. युद्ध झाले असते, तर आज बांगलादेश अस्तित्वात नसता. त्यांनी लष्करप्रमुख जनरल माणेकशा यांना बोलावले. परिस्थितीचा आढावा घेतला. माणेकशा यांनीही तो इंदिराजींसमोर मांडला. येथे इंदिराजींच्या मुत्सद्दी धोरणाचा व दूरदृष्टीचा प्रत्यय आला. इंदिराजींना युद्ध लवकर संपवायचे होते. कारण, आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता. माणेकशा यांनी माहिती दिली. काही अवधी मागितला. इंदिराजींनी माणेकशा यांना अवधी व स्वातंत्र दिले. माणेकशा यांनी लष्करी तयारी, तर इंदिराजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू सांभाळली. अमेरिका पाकला युद्धात मदत करणार, हे उघड होते. याला शह देण्यासाठी त्यांनी सोव्हिएत रशियाशी करार केला. याचा उपयोग झाला. इंदिराजीच्या धोरणामुळे हे युद्ध भारतीय लष्कर १४ दिवसांत जिंकू शकले.पंतप्रधानांना दोन आघाड्यांवर हे युद्ध लढावे लागले. कमी दिवसांत युद्धाचा निकाल लावायचा होता. पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करायचे होते. पश्चिम भागात पाकिस्तान भारतावर आक्रमण करेल, हे त्यांना माहीत होते. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे डाव हाणून पाडले. युद्धाच्या १२ दिवसांत पाकिस्तान शरणागती पत्करेल, हे समजले, तेव्हा त्यांनी बांगलादेशचे भारतात विलीनीकरण केले नाही. मोठेपणा दाखवून पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला आणि मुजिबुर रेहमान यांच्याकडे त्या देशाची सूत्रे सोपवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली.पाकिस्तानच्या भूमीवर लढून ९८ हजार पाक सैनिकांना भारताने युद्धकैदी बनवले. पण त्यांना वाºयावर सोडले नाही. त्यांना बांगलादेशात ठेवले असते, तर तेथील नागरिकांनी त्यांना ठार केले असते. हे माहीत असल्याने इंदिराजींनी सर्व युद्धकैद्यांना भारतात आणले. दोन वर्षे त्यांना सांभाळले. या युद्धात पाकिस्तानची हानी भारताने केली. पश्चिम पाकमधील मोठा भूभाग भारताने जिंकला. सुपीक प्रांतातील ३५० गावे भारताच्या ताब्यात होती. पुढे सिमला करार झाला. युद्धकैद्यांना परत पाठविताना भारतीय भूभाग व काश्मीरमधील ताबा देण्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांनी मान्य केले. मात्र, त्यांनी शब्द पाळले नाहीत. इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व एवढे मोठे होते, की त्यांनी शत्रूवरही विश्वास दाखविला. १९७१च्या युद्धातील यश हे केवळ इंदिराजींचे नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी यामुळेच मिळाले.

(शब्दांकन : निनाद देशमुख)

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष