शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पाकचे नागरी वस्त्यांवर हल्ले सुरूच; लाख लोकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:44 IST

सातत्याने तोफगोळ्यांचा मारा : आतापर्यंत ११ ठार, ६0 जखमी

जम्मू : गेल्या नऊ दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय हद्दीतील लष्करी चौक्या व नागरी वस्त्यांवर तोफगोळ्यांचा सातत्याने चालविलेला मारा बुधवारी रात्रीनंतर थांबविला होता. सीमेवर शांतता निर्माण झाली होती. परंतु लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडताच पाकने पुन्हा रात्रीपासून राजौरी जिल्ह्याच्या लाम व नौशेरा भागात व प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर उरी क्षेत्रात गोळीबार सुरू केला. त्यात एक भारतीय रहिवासी मरण पावला.गेल्या नऊ दिवसांत पाकने केलेल्या माऱ्यात भारतीय हद्दीतील ११ जणांचा मृत्यू झाला व ६० जण जखमी झाले होते. सीमेलगतचे अर्निया शहर व परिसरातल्या १२० गावांमधील नागरिक आपली घरेदारे सोडून एक तर नातेवाइकांकडे किंवा सरकारने कथुआ, सांबा, जम्मू जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहायला गेले आहेत. आतापर्यंत एक लाखांवर लोकांनी स्थलांतर केले आहे. (वृत्तसंस्था)मंत्र्यांची भेट, जखमींची केली विचारपूसजम्मू-काश्मीरचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंदर राणा व त्या पक्षाचे खासदार जुगलकिशोर शर्मा यांनी तोफगोळ्यांच्या माºयात जखमी झालेल्यांची जम्मूतील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. माºयामुळे सीमाभागात उद््भवणाºया विपरीत परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत पुरविण्यासाठी पोलीस व अन्य यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आदेश राज्याचे पुनर्वसन मंत्री जावेद मुस्तफा मीर व सार्वजनिक आरोग्य मंत्री श्याम चौधरी यांनी दिले आहेत. या दोघांनी आर एस पुरा भागात गावांना भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनीभेट घेतली.अर्निया शहरात सुमारे साडेअठरा हजार लोक राहतात. पण आता तेथे काही पोलिसांव्यतिरिक्त कोणीही नजरेस पडत नाही.गुरेढोरे व लोकांच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी पोलीस अहोरात्र अर्निया व आजूबाजूच्या गावांत गस्त घालत आहेत.आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या पाच किमी भागातील २०० शिक्षणसंस्था गेले पाच दिवसबंद आहेत. शेतीव अन्य सारी कामे ठप्प आहेत.यंदाच्या वर्षी पाकने ८०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान