शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत माता की जय’ न म्हणणारे पाकिस्तानी!, भाजपा आमदाराचे उद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:51 IST

भारत माता की जय न म्हणणा-यांना तर राजकारणात प्रवेशच करू द्यायला नको. ज्या लोकांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात मनात काही किंतू असेल, तर ते...

बलिया (उत्तर प्रदेश) : ‘भारत माता की जय’ जे म्हणणार नाहीत ते पाकिस्तानी आहेत, असे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी सोमवारी येथे म्हटले.बैरिया मतदार संघातून निवडून आलेले सुरेंद्र सिंह यांनीच काही दिवसांपूर्वी भारत २०२४ पर्यंत हिंदू राष्ट्र बनेल, असे जाहीर केले होते. रातसाद येथील कार्यक्रमात सुरेंद्र सिंह म्हणाले की, भारत माता की जय न म्हणणा-यांना तर राजकारणात प्रवेशच करू द्यायला नको. ज्या लोकांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात मनात काही किंतू असेल, तर ते पाकिस्तानी असून देशात राहण्याचा त्यांना हक्क नाही. जे लोक आपल्या मातृभूमीला आईचा दर्जा देत नाहीत, त्यांची देशभक्ती संशयास्पद आहे. ज्यांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणताना अडचणी आहेत, त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचीच परवानगी असू नये, असेही त्यांनी म्हटले. बल्लिया येथे १४ जानेवारी रोजी बोलताना सिंह म्हणाले होते की, एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की, जे हिंदू संस्कृतीशी एकरूप होतील, तेच मुस्लीम या देशात राहतील. फारच थोडे मुस्लीम हे देशभक्त आहेत. एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की, जे मुस्लीम आमच्या संस्कृतीशी एकरूप होतील, ते भारतात राहतील. सुरेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवतारी पुरुष अशा शब्दांत वर्णन केले व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला केला. (वृत्तसंस्था)पोलिसांना थप्पड माराबेकायदा खाणकामाबद्दल बोलताना सुरेंद्र सिंह यांनी असा सल्ला दिला की, खासगी कामासाठी वाळू घेताना कुणा पोलिसांनी अडवले, तर त्यांना सरळ दोन थपडी मारा.

टॅग्स :BJPभाजपा