शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर 'सायबर स्ट्राईक'; भारतीय हॅकर्सकडून 200हून अधिक साईट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 11:16 IST

पुलवामा हल्ल्याच्या चार दिवसांनंतरच भारतीय हॅकर्सनं पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला केला आहे.

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्याच्या चार दिवसांनंतरच भारतीय हॅकर्सनं पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला केला आहे. भारतीय हॅकर्सच्या एका गटानं पाकिस्तानच्या जवळपास 200हून अधिक वेबसाइट्स हॅक केल्यात आहेत. टीम आय-क्रूद्वारा हॅक करण्यात आलेल्या या वेबसाइट्स ओपन केल्यास पुलवामा हल्ल्यातील भारतीय शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचं निदर्शनास येतं आहे आणि पेटती मेणबत्तीही नजरेस पडत आहे. तसेच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं तिरंग्याच्या रंगांमध्ये उडताना दिसत आहेत.पेजवर लिहिलं आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना आमची श्रद्धांजली. तसेच याशिवाय असाही मेसेज लिहिण्यात आला आहे की, 14/02/2019चा हल्ला आम्ही विसरणार नाही. पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्या वीर जवानांना आम्ही आदरांजली वाहतो. आम्हाला माफ करा ?, आम्ही विसरून जाऊ ?, भारत हा हल्ला कधीही विसरणार नाही. तुमच्यानुसार, देशभक्ती-युद्ध-जिहाद- शिट, असाही मेसेज या हॅक करण्यात आलेल्या पेजवर पाहायला मिळतोय. पाकिस्तानी सायबर जगतातला हा सर्वात मोठा हल्ला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचीही वेबसाइट हॅक करण्यात आली होती. पुलवाम्यात 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका बसवर हल्ला केला होता. त्यात आपले 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी जोरदार सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. व्यापाऱ्यांनीही आज बंदची घोषणा दिली आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानMartyrशहीद