शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ताबारेषेवर जोरदार गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 19:54 IST

श्रीनगर : एकीकडे काश्मीरप्रश्नावर अखंड चर्चा हवी असल्याचे पाकिस्तानकडून सांगितले जात असतानाच आज घुसखोरीचा प्रयत्न फसल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानच्या बाजुने दहशतवादी मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न करत आहेत. सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यातील कमलकोट ...

श्रीनगर : एकीकडे काश्मीरप्रश्नावर अखंड चर्चा हवी असल्याचे पाकिस्तानकडून सांगितले जात असतानाच आज घुसखोरीचा प्रयत्न फसल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. 

गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानच्या बाजुने दहशतवादी मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न करत आहेत. सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यातील कमलकोट क्षेत्रामध्य जोरदार गोळीबार करण्यात आला. यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. याचबरोबर पाक सैन्याने 120 एमएम उखळी तोफांचा माराही केला. पाकच्या या आगळीकीला भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन दिवसांपूर्वीच कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकने गोळीबार केला होता.

भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान भारतीय जवानांचे लक्ष हटविण्याचा प्रयत्न करत असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. रविवारी दहशतवाद्यांच्या एका गटाने नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला होता. याआधी शनिवारी कुपवाडा जिल्ह्यात केलेल्या कारवाईत घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान