शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 नागरिकांचा मृत्यू

By admin | Published: May 13, 2017 8:54 AM

जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 13 - सीमारेषेवरील वाढत्या हल्ल्यांवरुन पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचेच दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. शनिवारीदेखील जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी असल्याचे वृत्त आहे. सकाळीपासूनच नौशेरा परिसरातील कलसिया भागात पाकिस्ताननं तोफांचा मारा सुरू केला आहे. दरम्यान, भारतीय जवानदेखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
 
 
गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेले हल्ले
12 मे : अरनिया सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन
शुक्रवारी अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला बीएसएफकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या  गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता. 
बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला. 
10 मे : राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून हल्ला 
बुधवारी रात्री जवळपास 10.45 वाजण्याच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा पती जखमी झाला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगित दिल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार करण्यात येत असल्याचं निदर्शनास आले आहे.