शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावेच पुरावे; भारतीय हवाई दलाकडून दाव्यांची चिरफाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 19:48 IST

पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा हवाई दलाकडून पर्दाफाश

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानंपाकिस्तानी सैन्याच्या सर्व दाव्यांची चिरफाड केली आहे. भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले नाहीत, एफ-16 विमानाचा वापर झालेलाच नाही, असे विविध दावे पाकिस्तानकडून करण्यात आले होते. हे सर्व दावे भारतीय हवाई दलानं खोडून काढले. 'प्रत्येक विमानाचा एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. भारतीय संरक्षण दलांना मिळालेला सिग्नल एफ-16 सोबत जुळतो. पाकिस्तानचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी आम्हाला आमराम मिसाईलचे काही अवशेषदेखील सापडले आहेत. आमराम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ एफ-16 विमानांमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्ताननं एफ-16 विमानाचा वापर झाला होता, हे सिद्ध होता,' अशा शब्दांमध्ये हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पाकिस्तानच्या सर्व दाव्यांचं पोस्टमॉर्टम केलं. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात हवाई दलानं पाकिस्तानच्या कारवायांची आणि त्याला भारताच्या बाजूनं देण्यात आलेल्या प्रत्युत्तराची माहिती दिली. यावेळी कपूर यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला.हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पाकिस्तानचे सर्व दावे मुद्देसूदपणे खोडून काढले. 'पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचे पुरावे आहेत. एफ-16 विमानांची हालचाल दिसताच हवाई दलानं प्रत्युत्तर दिलं. हे विमान अनेक ठिकाणी दिसलं. मिग-27, मिराज 2000, सुखोई विमानांनी एफ-16 च्या हालचाली टिपल्या. एफ-16 नं लष्करी तळांजवळ हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून बॉम्ब टाकण्यात आले. लष्करी तळांच्या परिसरात बॉम्ब टाकले गेले. मात्र त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. यामुळेच हवाई दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत एफ-16 पाडलं. मिग 27 विमानानं एफ-16 जमीनदोस्त केलं,' अशी माहिती कपूर यांनी दिली.

एफ-16 विमानाचा वापर केला नाही, असा दावा पाकिस्ताननं केला. तोदेखील कपूर यांनी खोडून काढला. 'प्रत्येक विमानाचा एक विशिष्ट इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. पाकिस्तानी विमानाकडून मिळालेला सिग्नल हवाई दलानं टिपला. तो एफ-16 शी जुळतो. पाकिस्तानकडे असलेल्या विमानांपैकी केवळ एफ-16 विमान आमरार मिसाईल घेऊन जाऊ शकतं आणि भारतीय हवाई दलानं पाडलेल्या विमानाजवळ आमरार मिसाईलचे अवशेष सापडले आहेत. यावरुन पाकिस्ताननं एफ-16 वापरल्याचं स्पष्ट होतं,' असं कपूर यांनी सांगितलं.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तान