शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:05 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. भारताबद्दल अपप्रचार करणारी अनेक यु ट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे यु ट्यूब चॅनेलही बंद करण्यात आले. 

India Pakistan News: भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली जात आहे. सिंधू नदीचे पाणी रोखण्याबरोबरच सीमेवरही कारवाई केली जात आहे. याच दरम्यान, एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे यु ट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत हल्ला करणार असल्याचे विधान करणारे पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांचेही एक्स खाते ब्लॉक करण्यात आले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पाकिस्तानसोबतचे संबंध पहलगाम हल्ल्यानंतर ताणले गेले आहेत. डिजिटल माध्यमांतूनही कारवाई केली असून, अनेक यु ट्यूब चॅनेल्स भारतात बंद करण्यात आले आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे यु ट्यूब चॅनेलही ब्लॉक करण्यात आले आहे. 

वाचा >>पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा

शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनेलवर 'हा कॉन्टेट राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित आदेशांमुळे सध्या उपलब्ध नाहीये. अधिक माहितीसाठी गुगल पारदर्शकता अहवाल बघा', असा मेसेज दाखवला जात आहे. 

पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्र्याचे एक्स खाते ब्लॉक

भारताने पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांचे एक्स खाते ब्लॉक केले आहे. तरार यांच्या एक्स खात्यावर हे खाते रोखण्यात आले आहे, असा मेसेज दिसत आहे. 

भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढल्यानंतर अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री एक पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली होती.

'पाकिस्तानकडे ठोस माहिती आहे की, भारत २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आधार घेऊन पुढील २४ ते ३६ तासांता पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याची शक्यता आहे', असे तरार म्हणाले होते. 

भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक

बैसरन पठारावरून दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. १६ यु ट्यूब चॅनेल्स बंद करण्यात आली आहेत, ज्यावरून भारताबद्दल चिथावणीखोर, असत्य आणि संवेदनशील स्वरुपातील आशय प्रसारित केला जात होता. 

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून आता बीबीसीच्या वार्तांकनावरही नजर ठेवली जात आहे. बीबीसीने पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना बंडखोर म्हटले होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानYouTubeयु ट्यूब