शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

काश्मिरात अतिरेकी घुसवण्यासाठी पाकच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:48 IST

सुरक्षा यंत्रणा सतर्क

जम्मू : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या पाकिस्तानच्या कारवाया गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. पाकिस्तानात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या तळांमध्ये नेहमीपेक्षा अधिक संख्येने दहशतवादी जमा झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी दिली.ते म्हणाले की, घुसखोरीच्या प्रयत्नांबरोबरच पाकिस्तानी लष्कर शस्त्रसंधीचेही वारंवार उल्लंघन करीत आहे. ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी रणबीरसिंग यांनी वरिष्ठ लष्करी व गुप्तचर अधिकाऱ्यांची श्रीनगरमध्ये बैठक घेतली. यासंदर्भात उधमपूर येथील लष्करी अधिकाºयांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काश्मीरमध्ये शांतता टिकून राहावी यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी लष्करी अधिकाºयांना दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकांची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तान गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांद्वारे खोट्या माहितीचा प्रसार करीत आहे. या अफवांना बळी पडू नका, असे आवाहनही रणबीरसिंग यांनी केले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचाराचा भडका उडू नये म्हणून भारतीय लष्कर अत्यंत सतर्क असल्याचेही त्यांनी सांगितले.काश्मीरमध्ये शांतता३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मंजूर झाला. इतक्या मोठ्या घडामोडीनंतरही काश्मीरमध्ये शांतता असल्याचा दावा तेथील पोलिसांनी केला आहे. रविवारी काश्मीरमध्ये जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले होते. सोमवारी ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना स्थानबद्ध केले आहे.राज्यातील लँडलाईन, मोबाईल, इंटरनेट सेवा काही काळापुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग म्हणाले की, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती संपूर्ण नियंत्रणाखाली आहे. किश्तवार, राजौरी भागामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३७० कलम रद्द करण्याच्या निषेधार्थ कारगिलमध्ये संयुक्त कृती समितीने बंदची हाक दिली होती. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील स्थितीचा सोमवारी एका बैठकीत आढावा घेतला.370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक कारवाया केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांनी अतिशय सतर्क राहायला हवे, असे माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी म्हटले आहे. काश्मीरबाबत सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Pakistanपाकिस्तान