कुठेही जाण्यास मुभा
नवी दिल्ली : 26/11च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसून देशात कोठेही जाण्यास तो मुक्त आहे, असे स्पष्ट करत पाकिस्तानने सोमवारी त्याला मोकाट सोडले.
हाफीज हा पाक नागरिक आहे. तो देशात मुक्तपणो फिरू शकतो. मग समस्या काय आहे. पाकच्या दृष्टीने याबाबत कोणतीही समस्या येत नाही, असे पाकचे भारतातील उच्चयुक्त अब्दुल बासीत यांनी सांगितले. सईद पाकिस्तानी लष्करासोबत प्रत्यक्ष ताबारेषेलगत काम करत असल्याच्या वृत्ताबाबत बासीत यांना छेडले असता त्यांनी हे उत्तर दिले. न्यायालयांनी त्याची निदरेष सुटका केली आहे. त्याच्याविरुद्ध कोणताही खटला प्रलंबित नाही, असे बासीत यांनी पत्रकारांना सांगितले. 2क्क्8 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सईद हा सूत्रधार असल्याचे भारताने वेळोवेळी म्हटले. 166 जणांचा बळी घेतलेल्या या हल्ल्याबाबत पाकमध्ये खटला सुरू असून त्याच्या धीम्या गतीचा भारताने निषेध केला आहे.