शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:50 IST

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या (एसएसजी) ६००हून अधिक कमांडोंनी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे, असा दावा जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक शेषपाल वैद यांनी केला आहे. या कमांडोंचे नेतृत्व पाक लष्कराचा जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) आदिल रहमानी करत आहे, तसेच आणखीही कमांडो सीमा ओलांडून येण्याच्या तयारीत असल्याचे वैद म्हणाले. 

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद म्हणाले की, पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये शिरले असून भारतीय लष्कराच्या १५व्या व १६व्या कोअरला कारवाईत गुंतवून ठेवायचे, असा कट त्यांनी आखला आहे. हा एक प्रकारचा गनिमी कावा असून, त्याचा भारताने कठोर मुकाबला केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

ही युद्धाची पूर्वतयारीच, तसेच उत्तर द्यावे लागेल

शेषपाल वैद यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराचा लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम याने जम्मू-काश्मीरमध्ये याआधीच घुसखोरी केली आहे. त्याने सर्व स्लीपर सेल सक्रिय केले आहेत.  वैद यांनी दावा केला की, पाकिस्तानी लष्कराच्या आणखी दोन बटालियन जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. काश्मीरमध्ये ज्यापद्धतीने हल्ले करण्यात आले ती युद्धाची पूर्वतयारी आहे. त्यानुसारच भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. खोऱ्यात गेल्या काही महिन्यांत भारतीय लष्करी जवानांवर ज्या पद्धतीने हल्ले झाले त्यामागे पाकिस्तानी लष्कराचा हात आहे, असा कयास भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. 

...मोठ्या युद्धाची तयारी

काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून ज्या कारवाया सुरू आहे, त्या अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची भारताने तयारी ठेवायला हवी. - शेषपाल वैद

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान