शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'गिलगिट बाल्टिस्तान भारताचाच भाग; पीओके पूर्णपणे दहशतवाद्यांच्या नियंत्रणात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 20:40 IST

जम्मू-काश्मीर अशांत करण्याचे प्रयत्न सफल होणार नाहीत- लष्करप्रमुख

श्रीनगर: जम्मू-काश्मीर अशांत करण्याचा पाकिस्तानचा डाव कधीही यशस्वी ठरणार नाही, असं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून भारत त्या भागाच्या विकासाचं लक्ष्य गाठेल, असंदेखील ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानी प्रशासनाच्या नव्हे, तर दहशतवाद्यांच्या नियंत्रणात असल्याचं लष्करप्रमुख रावत यांनी म्हटलं.पाकव्याप्त काश्मीर पूर्णपणे दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ नये, या भागाचा विकास होऊ नये यासाठी दहशतवाद्यांकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. त्यामुळेच काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यांचा जळफळाट झाला, असं लष्करप्रमुख म्हणाले. पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तान जम्मू-काश्मीरचा भाग आहेत. मात्र तो सध्या पश्चिमेकडच्या शेजाऱ्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी या भागावर अवैध कब्जा केला आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. जम्मू-काश्मीरमध्ये पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानचादेखील समावेश होतो. या भागावर सध्या पाकिस्तानचा अवैध कब्जा आहे. पीओकेतील दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते कधी बाहेरील राज्यांमधून आलेल्या सफरचंदांच्या व्यापाऱ्यांच्या हत्या घडवतात, तर कधी दुकानं उघडू नये यासाठी धमक्या दिल्या जातात. इतकंच काय विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये यासाठीदेखील ते प्रयत्न करतात. दहशतवाद्यांच्या पाठिंब्यानं या सगळ्या कारवाया केल्या जातात, असं लष्करप्रमुख एका कार्यक्रमात म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीBipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवान