शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरवर बोलायचा पाकला अधिकारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 04:57 IST

राजनाथसिंह; भारतात घातपाती कारवाया करणे थांबवा

लेह : काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून, त्याविषयी बोलायचा पाकिस्तानला काडीचाही अधिकार नाही असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ठणकावले आहे. येथे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट (डीआरडीओ) या संस्थेतर्फे गुरुवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.काश्मीर पाकिस्तानचे होते कधी की ते या प्रदेशाबद्दल इतके अश्रू ढाळत आहेत असाही सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर एक देश म्हणून त्याचा भारताने नेहमीच आदर केला आहे. पाकिस्तानशी आम्हाला उत्तम संबंध हवे आहेत. मात्र त्याआधी भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचे पाकिस्तानने थांबविले पाहिजे.

मोदी सरकारने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्या निर्णयानंतर राजनाथसिंह लेहमध्ये पहिल्यांदाच आले होते. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचे गेल्या काही दिवसांत अनेक प्रयत्न केले. पण त्याची इतर देशांनी गंभीर दखल घेतली नाही. लडाखमधील सुरक्षा व्यवस्थेचा राजनाथसिंह यांनी या दौऱ्यामध्ये आढावा घेतला. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवी हक्कांची जी गळचेपी सुरू आहे, त्याबद्दल पाकिस्ताननेबोलले पाहिजे. काश्मीर प्रश्नाबाबत कोणताही देश पाकिस्तानसोबत नाही. ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे आपण अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क इस्पेर यांना दूरध्वनीवरील संभाषणात सांगितल्याचेही राजनाथसिंहम्हणाले. (वृत्तसंस्था)राजनाथसिंह लडाखमध्येसंरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी लडाख येथील ‘किसान विज्ञान मेळ्या’ला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘डीआरडीओ’च्या फार्ममध्येही पाहणी केली.बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानाकाश्मीरवर काहीही हक्क नसताना पाकिस्तान सध्या बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा रीतीने वागत आहे.लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन तेथील स्थानिक नागरिकांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे.३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीर, लडाखच्या विकासातील मोठा अडथळा दूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Article 370कलम 370ladakhलडाख