शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:05 IST

पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच गुजरात दौऱ्यावर आहेत. ते मंगळवारी गांधीनगर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला अल्टिमेटमही दिला. पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची झोंबली आहे. तो शांततेच्या गप्पा मारू लागला आहे. पंतप्रधान मोदींचे विधान प्रादेशिक शांततेला धोका निर्माण करणारे आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी वडोदरा, भुज आणि दाहोदलाही भेट दिली.

पंतप्रधान मोदींच्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "भारताच्या पंतप्रधानांनी गुजरातमधून केलेल्या विधानाची पाकिस्तानने दखल घेतली आहे. त्यांच्या विधानामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण गोऊ शकतो. आम्हाला शांतता हवी आहे. पण आम्हाला धोका वाटला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ."

पाकिस्तानने स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे -पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? -गुजरातमधील गांधीनगर येथे बोलताना पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत म्हणाले, “६ मे च्या रात्री पाकिस्तानात जे मारले गेले, त्यांना स्टेट ऑनर देण्यात आला. त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले आणि तेथील सैन्याने त्यांना सलामीही दिली. यावरून स्पष्ट होते की, दहशतवादी कारवाया हे प्रॉक्सी वॉर नाही, तर तुमची (पाकिस्तानची) विचारपूर्वक आखलेली युद्धनीती आहे. जर तुम्ही युद्ध करत असाल, तर तुम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर मिळेल." तत्पूर्वी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. 

टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर