शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला सतावतेय सर्जिकल स्ट्राइकची भीती? LoC जवळचे दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड केले खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 11:08 IST

पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराकडून कठोर कारवाईचे संकेत मिळत असून, सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच यावेळीही कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे पाकिस्तानचा थरकाप उडाला आहे.

ठळक मुद्देपुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराकडून कठोर कारवाईचे संकेतउरी येथील हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच यावेळीही कारवाई होण्याची शक्यता पाहून पाकिस्तानचा भीतीने थरकाप

श्रीनगर - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराकडून कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. उरी येथील हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच यावेळीही कारवाई होण्याची शक्यता पाहून पाकिस्तानचा भीतीने थरकाप उडाला असून, पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ असलेले दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड रिकामे करून दहशतवाद्यांना सैनिक तळांमध्ये नेल्याचे वृत्त आहे. पुलवामा येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैश ए मोहम्मद विरोधात कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आल्याची घोषणा केली होती. तसेच लष्करानेही या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भारताकडून कारवाईसाठी सुरू असलेल्या मोर्चेबांधणीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळच्या आपल्या विंटर पोस्ट खाली केलेल्या नाहीत. काश्मीरमधील बोचऱ्या हिवाळ्यामुळे या काळात विंटर पोस्ट खाली केल्या जातात. मात्र सध्या तेथे पाकिस्तानी सैनिक तैनात आहेत.  सीमारेषेच्या दोन्ही बाजूला तणावाचे वातावरण आहे. मात्र अद्याप लष्कराची तैनाती झालेली नाही, अशी माहिती काश्मीरमधील गुप्तचर खात्यामधील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेपलिकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर कारवाई करण्याचा भारताची इरादा नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पर्यायच भारतीय लष्कराकडे उरतो. मात्र अशा कारवाईमुळे तणाव अधिकच वाढू शकतो. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर