शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या राष्ट्रपतींना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही- पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 17:02 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच आईसलँडच्या दौऱ्यावर

इस्लामाबाद: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही, अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली आहे. रामनाथ कोविंद आईसलँडच्या दौऱ्यासाठी जाणार आहेत. मात्र त्यांच्यासाठी एअरस्पेस उघडणार नाही, अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याबद्दलची माहिती दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 17 सप्टेंबरपासून आईसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. भारताचे राष्ट्रपती आईसलँडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाता यावं, यासाठी भारताकडून परवानगी मागण्यात आली होती. मात्र पाकिस्ताननं कोविंद यांना परवानगी नाकारली, अशी माहिती कुरेशींनी सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या पीटीव्हीला दिली. पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. फेब्रुवारीत भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केला होता. पाकिस्तानच्या हद्दीतील जैश-ए-मोहम्मदच्या सर्वात मोठ्या दहशतवादी तळांवर हवाई दलानं हल्ला चढवला होता. त्यानंतर पाकिस्ताननं एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये हे निर्बंध काहीसे शिथिल केले होते. मात्र भारतासाठी निर्बंध कायम ठेवण्यात आले. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं.  

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक