शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

चीन-पाकिस्तानची हातमिळवणी धोकादायक; आव्हानांना तोंड देण्यास भारत सज्ज- लष्करप्रमुख

By कुणाल गवाणकर | Updated: January 12, 2021 13:02 IST

सीमेपलीकडून होणाऱ्या कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम; लष्करप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली: पाकिस्तान आणि चीन यांचं एकत्र येणं भारतासाठी धोकादायक आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम सुरू आहे. त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर दिलं जाईल. त्यासाठीची वेळ आणि ठिकाण आम्ही निश्चित करू, असा स्पष्ट इशारा लष्करप्रमुख मनोज नरवणेंनी दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी देशापुढील धोक्यांची माहिती दिली.पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिलं जातं. मात्र आम्ही दहशतवाद कदापि सहन करणार नाही. ही आमची भूमिका आहे. दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यासाठीची वेळ आणि ठिकाण आम्ही निश्चित करतो, हा संदेश आपल्याकडून सीमेपलीकडील देशाला देण्यात आलेला आहे, असं नरवणे म्हणाले. यावेळी त्यांनी चीन आणि पाकिस्तानच्या जवळिकीवरही भाष्य केलं. 'लष्करी आणि बिगरलष्करी क्षेत्रांमध्ये चीन आणि पाकिस्तानचं सहकार्य वाढत आहे. त्यामुळे दोन आघाड्यांवर आव्हांनाचा सामना करण्याची तयारी आपल्याला ठेवायला हवी,' असं नरवणे म्हणाले.चिनी सैन्यासोबत लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप संपलेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. 'आम्ही याआधीही आव्हानांचा सामना करून मार्गक्रमण केलं आहे. भारतीय लष्करानं लडाखमध्येच नव्हे, तर संपूर्ण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्ती वाढवल्या आहेत. भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील आठ बैठका झाल्या आहेत. आता लवकरच नववी बैठक होईल,' असं नवरणेंनी सांगितलं.कोरोना महामारी आणि उत्तर सीमांवरील परिस्थिती आमच्यापुढील दोन प्रमुख मोठी आव्हानं होती. सीमेवरील परिस्थिती पाहता आम्ही सीमेवरील सतर्कता वाढवली आहे. सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे. पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे तयार आहोत, अशा शब्दांत नरवणेंनी चीनला इशारा दिला. भविष्यातील आव्हानांचा विचार लष्कराला अधिकाधिक सुसज्ज करण्यात येईल. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल, असं नरवणे म्हणाले.

टॅग्स :manoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तान