पाकिस्तानची सीमेवर पुन्हा आगळीक
By admin | Updated: January 22, 2015 00:06 IST
जम्मू-पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री जम्मू जिल्ात आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) त्यांना प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानची सीमेवर पुन्हा आगळीक
जम्मू-पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री जम्मू जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) त्यांना प्रत्युत्तर दिले.बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार पाकी सैनिकांनी अरनिया सेक्टरमधील चौक्यांवर लहान शस्त्रांनी तुफान गोळीबार केला. त्यानंतर सकाळी ७ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. यात कोणत्याही प्रकारची जीवहानी झाल्याचे वृत्त नाही. सीमा सुरक्षा दलाने मंगळवारी या भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडल्यानंतर हा गोळीबार सुरू झाला होता. यापूर्वी १३ जानेवारीला सांबा क्षेत्रात आणि ११ जानेवारीला कठुआ जिल्ह्यातील हीरानगर क्षेत्रात पाककडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)