शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकची खुमखुमी संपता संपेना!

By admin | Updated: October 23, 2016 01:20 IST

जम्मू-काश्मीरच्या आर. ए. पुरा सेक्टर भागातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैन्याकडून शुक्रवारी रात्रीपासून गोळीबार व बॉम्बहल्ले सुरू आहेत. पाक रेंजर्स जोरदार गोळीबार करीत

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या आर. ए. पुरा सेक्टर भागातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैन्याकडून शुक्रवारी रात्रीपासून गोळीबार व बॉम्बहल्ले सुरू आहेत. पाक रेंजर्स जोरदार गोळीबार करीत असून, बीएसएफचे जवान त्यांना चोख उत्तर देत आहेत.हिरानगर सेक्टरमध्ये पाक रेंजर्सनी काल गोळीबार केला होता. त्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात ७ पाक रेंजर्स व एक दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतरही पाकिस्तानी सैन्याची खुमखुमी संपली नसून, त्यांनी रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार आणि बॉम्बहल्ले सुरू केले. आमचे जवान त्यांना पूर्ण ताकदीनिशी उत्तर देत आहेत. गोळीबारात गावकरी जखमी होऊ नये, असे आमचे प्रयत्न असल्याचे बीएसएफचे महानिरीक्षक डी. के. उपाध्याय यांनी सांगितले.ज्या सहा भागांमध्ये पाक सैन्याकडून गोळीबार, बॉम्बहल्ले सुरू आहेत, तेथील शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी एका पाकिस्तानी हेराला तर बारामुल्ला जिल्ह्यात जैश ए महम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. दहतवाद्यांकडून एक एके४७ रायफल, एक पिस्तुल व काही स्फोटके, शस्त्रसाठा ताब्यात घेतला. हेराकडून सुरक्षा दलाच्या तैनातीची माहिती असणारे नकाशे व दोन सीम कार्ड्स जप्त केली आहेत. (वृत्तसंस्था)सततच्या गोळीबारामुळे सीमारेषेजवळील गावकऱ्यांचे हाल सुरू आहेत. लोकांना जगणे कठीण झाले आहे. गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेकांना याआधीच सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, अशी माहिती जम्मूचे पोलीस उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी दिली.