जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी पूँछमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करीत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यात दोन महिलांसह सहा जण जखमी झाले असून सहा घरांची नासधूस झाली. भारतीय जवानांनी गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
बुधवारी रात्रीपासून सब्जियन आणि मंडी भागात पाकिस्तानी सैनिकांनी स्वयंचलित शस्त्रे आणि छोटय़ा शस्त्रंचा तसेच 81 मि.मि. तोफांचा मारा केला. अधूनमधून गोळीबार सुरू होता. त्यात दोन्ही बाजूच्या जवानांची प्राणहानी झाली नसल्याचे एका अधिका:याने सांगितले. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळील गिग्रियाल आणि उडीपुरा या गावांना लक्ष्य बनविले होते. यापूर्वीही पाकने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.(वृत्तसंस्था)