शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन सैनिकांच्या मृतदेहांसाठी पाकचे पांढरे निशाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 07:03 IST

जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांची चोख प्रत्त्युतर दिले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांची चोख प्रत्त्युतर दिले आहे. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सैनिक ठार झाल्यानंतर, ते आमचे नसल्याचा दावा करणाºया पाकिस्तानी लष्कराला नंतर मात्र पांढरे निशाण दाखवून आपल्या दोन सैनिकांचे मृतदेह नेण्याची वेळ आली.या गोळीबारानंतर पाकिस्तानने मृतदेह नेण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय जवानांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर पांढरे निशाण फडकावून ते नेण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. हा प्रकार हाजीपूर सेक्टरमध्ये १0 व ११ सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला होता. पांढरे निशाण दाखवत असल्याचा व्हिडीओ १३ सप्टेंबरचा असून, तो शनिवारी समोर आला.पाकिस्तानच्या सैनिकांनी पांढरे निशाण हातात घेतले आहे आणि ते आपल्या सहकाऱ्यांचे मृतदेत नेत आहेत, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या पुराव्यामुळे आमचे सैनिक मरण न पावल्याचा पाकिस्तानचा आधीचा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे. पांढरे निशाण हे सरणागती वा युद्धविरामाच्या वेळी दाखविले जाते.पाकिस्तानचे जे दोन सैनिक गोळीबारात ठारझाले, त्यात पंजाब प्रांतातील बहावलनगर भागात राहणाºया गुलाम सरूल याचा समावेश आहे. पाकिस्तानच्या ठार झालेल्या सैनिकांमध्ये गुलाम सरूलचा समावेश आहे.दुसरा सैनिकही पंजाब प्रांतातील आहे. त्याचा मृतदेहताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला बरेच प्रयत्नकरावे लागले.या आधीही केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ५ ते ७ सैनिक व दहशतवादी ठार झाले होते. त्यांचे मृतदेह नेण्याचा पाकिस्तानी लष्कराने प्रयत्नच केला नव्हता. ते सैनिक आमच्या पंजाबमधील नसून काश्मीरचे वा नॉर्दन लाइट इन्फॅन्ट्रीचे आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. पाकिस्तानी सैनिकांमध्ये पंजाबी मुस्लिमांचे प्राबल्य असून, अन्य प्रांतांतील आपल्याच सैनिकांना ते फार महत्त्व देत नाहीत. (वृत्तसंस्था)