शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून गोळीबार सुरूच, 4 नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 14:54 IST

जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. अरनिया आणि सांबा सेक्टरनंतर पाकिस्तानी रेंजर्सचा आरएसपुरामध्येही गोळीबार सुरू आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. अरनिया आणि सांबा सेक्टरनंतर पाकिस्तानी रेंजर्सचा आरएसपुरामध्येही गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात सकाळपासून आतापर्यंत 4 नागरिकांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी कथुआ जिल्ह्यातल्या हिरानगर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात राम पॉल नावाच्या नागरिकाचा मृत्यू झाला.पाकिस्ताननं आतापर्यंत बीएसएफच्या जवळपास 40 चौक्यांना लक्ष्य केलं आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचाही मारा करण्यात येतोय. मृत नागरिकांमध्ये तीन जण हिरानगर सेक्टरमधल्या लोदी गावातले असून, एक जण अरनिया सेक्टरमधला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व सरकारी तसंच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी मंगळवारी पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आले होते. एलओसीला लागून असलेल्या अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरलाही पाकिस्ताननं निशाण्यावर घेतलं आहे. या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अखनूरमधल्या पल्ली गावात एक निरागस मुलाचा मृत्यू झाला होता.