पालखी बातमी जोड
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
महापौर-खासदारांची फुगडी
पालखी बातमी जोड
महापौर-खासदारांची फुगडीश्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ पाटील इस्टेटच्या जवळ आल्यानंतर भाविकांनी विठूनामाचा एकच जयघोष सुरू केला. सर्वांच्याच अंगी चैतन्य संचारले होते. महापौर दत्तात्रय धनकवडे व खासदार अनिल शिरोळे हेही या जयघोषात तल्लीन झाले. पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांसोबत या दोघांनीही महापालिकेच्या स्वागत कक्षासोरच फुगडीचा फेर धरला. इतरांनी त्यांच्या या फुगडीला उत्स्फुर्तपणे विठ्ठलाचा गजर करीत दाद दिली.----------