शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 06:33 IST

स्थानिक लोकांनी पर्यटकांना आश्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. या संकटाच्या काळात काश्मिरींनी पर्यटकांची अतिरिक्त देखभाल करून आपलेसे केले आहे. 

जम्मू - पहलगाममधील हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला असतानाच काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राने व देशभरातील पर्यटकांनी अत्यंत लवचीकपणा दाखवला आहे. हल्ल्यानंतरही हजारो पर्यटक काश्मीरचे प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट पाहण्यासाठी येत आहेत.

सोनमर्गपासून दूधपथरी व गुलमर्गच्या बर्फाच्छादित भागांपर्यंत पर्यटकांचा ओघ मोठ्या संख्येने सुरूच आहे. यामुळे येथील पर्यटनाबाबत व्यक्त करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील चिंता बाजूला सारल्या गेल्या आहेत. पर्यटन संचालक राजा याकूब यांनी सांगितले की, आमच्याकडे आजही श्रीनगरमध्ये १,३०० पेक्षा जास्त पर्यटक आहेत. काल गुलमर्गमध्ये ५,००० पेक्षा जास्त लोकांनी गंडोलाची सवारी केली. 

स्थानिक काळजी घेत आहेतसोनमर्गमधील एक पर्यटक प्रेरणा राजपूत यांनी सांगितले की, स्थानिक लोक, आम्ही व्यवस्थित आहोत की नाही? आम्हाला काही हवे-नको, याची ते  काळजी घेत आहेत. असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ दिली नाही.

देखभाल करून आपलेसे केलेहल्ल्यानंतरही बुकिंग कायम असल्याचे टूर ऑपरेटर्सनी सांगून वरील दाव्याला दुजोरा दिला. एका प्रमुख पर्यटन हितधारकाने सांगितले की, कॅब आजही पर्यटकांना लोकप्रिय ठिकाणी घेऊन जात आहेत. पर्यटक नेहमीप्रमाणे सोनमर्ग, दूधपथरी व गुलमर्गकडे जात आहेत. महामार्ग बंद असल्यामुळे विमानतळांवर गर्दी होती, असे त्यांचे म्हणणे आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक लोकांनी पर्यटकांना आश्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. या संकटाच्या काळात काश्मिरींनी पर्यटकांची अतिरिक्त देखभाल करून आपलेसे केले आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाtourismपर्यटनJammu Kashmirजम्मू-काश्मीर