शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

कॅमेरा असलेले हेल्मेट, हलकी एम४ कार्बाइन रायफल अन्...; पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:38 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवादी पाकिस्तानातून आल्याची माहिती समोर आली आहे.

Pahalgam Attack preliminary investigation: मंगळवारी पहलगाममधील बैसरन येथे भीषण असा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी तिथे असलेल्या पर्यटकांवर हल्ला करुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या पोलिसांच्या वेशात असलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारुन त्यांची निर्घृणपणे हत्या केली. ज्यामध्ये तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून डझनभराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये देशभरातील पर्यटकांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, या दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरुवातीच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या दहशतवाद्यांनी हेल्मेट घातले होते. त्या हेल्मेटमध्ये कॅमेरे बसवले होते ज्याद्वारे त्यांनी संपूर्ण घटनेचे व्हिडिओ शूटिंग केले. दहशतवाद्यांनी अमेरिकेत बनवलेल्या एम४ कार्बाइन रायफल्स आणि एके-४७ मधून गोळीबार केला. तीन दहशतवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर पर्यटकांना ओलीस धरलं आणि नंतर सर्व महिला आणि मुलांना बाजूला केलं. मग दहशतवाद्यांनी पुरुषांची ओळख पटवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

दहशतवाद्यांनी काही पळालेल्या पुरुषांवर दूरवरून गोळ्या चालवल्या. हा हल्ला सुमारे २०-२५ मिनिटे सुरु होता. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ज्या भागात हल्ला झाला तिथे वाहनांना परवानगी नाही. पर्यटक घोड्याने किंवा इतर मार्गांनी त्या ठिकाणी पोहोचू शकतात. त्यामुळे जाणीवपूर्वक हे ठिकाण निवडले गेले असावे. कारण दहशतवाद्यांना माहित होते की मदत पोहोचण्यासठी वेळ लागेल आणि त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढेल.

हल्ल्यानंतर घटनास्थळावरून सुमारे ५०-७० वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. या दहशतवाद्यांनी किश्तवाड येथून सीमा ओलांडून पहलगाममध्ये प्रवेश केला. स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने ते कोकरनाग मार्गे बेसरणला पोहोचला. हे दोन दहशतवादी एम४ कार्बाइन रायफल घेऊन आले होते. तर इतर दोघांकडे एके-४७ होती.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी