शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:10 IST

केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान संस्थेत लेखा सहायक म्हणून काम करणारे प्रशांत (४०) पर्यटनासाठी गेले होते.

जम्मू  : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील व्यावसायिक दिनेश मिरानिया हे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पहलगामला गेले होते. तेव्हा अतिरेक्यांनी पत्नी व दोन मुलांसमोर त्यांची हत्या केली. लग्नाचा वाढदिवस व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे कुटुंबीय प्रदीर्घ काळापासून काश्मिरात जाण्याचा विचार करत होते. परंतु आता संपूर्ण कुटुंबीय दिनेश यांच्या मृतदेहाची प्रतीक्षा करत आहे, हे दुर्दैव आहे. भाजपचे नेते व मिरानिया कुटुंबाचे नातेवाईक अमर बन्सल म्हणाले की, दिनेश हे माझ्या साडूचे भाऊ होते. त्यांना गोळी मारल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजता आम्हाला मिळाली परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे रात्री कळाले.

अनेक महिने पैसे साठवून पत्नी व मुलासह काश्मीरला गेले अन् झाली हत्याहल्ल्यात मृत्युमुखी पडलेले प्रशांत सत्पथी यांनी अनेक महिने आधीपासून पैसे साठवले होते. त्यानंतर ते पत्नी व ९ वर्षांच्या मुलासह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. प्रशांत यांचे मोठे बंधू सुशांत यांनी सांगितले की,  त्याने अनेक महिने पैसे साठवले होते. केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान संस्थेत लेखा सहायक म्हणून काम करणारे प्रशांत (४०) पर्यटनासाठी गेले होते. त्यांची पत्नी प्रियदर्शिनी आचार्या हिने सांगितले की, आम्ही रोपवेमधून उतरत असताना प्रशांत यांच्या डोक्याला गोळी लागली. 

सुजाता यांनी पतीला गोळी लागून मरताना पाहिले... मुलगा केवळ तीन वर्षांचापहलगाम येथे बंगळुरूमधील भारत भूषण हे पत्नी सुजाता व तीन वर्षीय मुलासह गेले होते. यातील भारत भूषण यांची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली. यात सुजाता व त्यांचा मुलगा वाचला.  सुजाता यांच्या मातोश्री विमला यांनी सांगितले की, भारत भूषण यांची पत्नी व मुलासमोर हत्या करण्यात आली. हल्ल्यात जीव गमावणारे अन्य एक व्यक्ती मंजूनाथ राव यांची बहीण रूपा हिने शिवमोगा येथे सांगितले की, त्यांचे कुटुंबीय प्रथमचराज्याबाहेर पर्यटनासाठी गेले होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला