शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:51 IST

Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत दोन स्थानिक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, या हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी आज उद्ध्वस्त केली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली होती. या घटनेमुळे देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत दोन स्थानिक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, या हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी आज उद्ध्वस्त केली.

लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं, ते स्फोट घडवून उडवण्यात आलं आहे. तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बेसरन खोऱ्यात हल्ला केल्यानंतर आसिफ शेख आणि आदिल हे दोघेही फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी लष्कराकडून जोरदार शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

आदिल शेख या दहशतवाद्याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तो २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथे त्याने दहशतवादाचं प्रशिक्षण घेतलं होतं. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो पुन्हा काश्मीरमध्ये परतला होता. पहलगामध्ये हल्ला घडवून आणण्यासाठी त्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्यानेच दहशतवाद्यांना बेसरन खोऱ्यापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले जात आहेत.

दरम्यान, मोहगामा येथे आसिफ शेख याच्या घरामध्ये शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दलांना एक संशयास्पद बॉक्स मिळाला. त्या बॉक्समधून तारा बाहेर आलेल्या होत्या. घटनास्थळावरच हा बॉक्स निकामी करण्यात  आला. यावेळी छोटासा स्फोट झाला. या स्फोटात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, ही कारवाई करण्यापूर्वी आजूबाजूच्या घरांना रिकामी करण्यात आलं होतं.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर