पान 7 : आठवीनंतर आयटीआय केल्यास दहावीचे समकक्ष प्रमाणपत्र
By admin | Updated: July 31, 2015 23:54 IST
- गोवा शिपयार्डमध्ये सप्टेंबरमध्ये आणखी 200 जणांना नोकर्या
पान 7 : आठवीनंतर आयटीआय केल्यास दहावीचे समकक्ष प्रमाणपत्र
- गोवा शिपयार्डमध्ये सप्टेंबरमध्ये आणखी 200 जणांना नोकर्यापणजी : इयत्ता आठवीनंतर दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम केल्यास दहावी उत्तीर्णचे समकक्ष प्रमाणपत्र बहाल करण्यात येईल. तसेच दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम केल्यास बारावी समकक्ष प्रमाणपत्र दिले जाईल, अशी घोषणा कारागीर प्रशिक्षणमंत्री दीपक ढवळीकर यांनी खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेवेळी जाहीर केले.येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये थिवी आणि वेर्णा येथे अँप्रेंटिसशीप भरती मेळावे घेऊन आयटीआय उत्तीर्णांना नोकर्यांची संधी दिली जाईल. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत देशभरात 24 लाख तरुणांना कौशल्य शिक्षण देण्यात येणार आहे. गोव्यातही हा उपक्रम नेटाने राबविला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.गोवा शिपयार्डला युद्धनौका बांधणीचे 32 हजार कोटींचे कंत्राट मिळाल्याने तेथे नोकर्या निर्माण झाल्या असून 100 जणांच्या नियुक्त्या तेथे झाल्या आहेत. आणखी 200 आयटीआय उत्तीर्णांची सप्टेंबरमध्ये नियुक्ती होईल, असे ढवळीकर म्हणाले.विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी बॉयलर अटेंडंटच्या प्रशिक्षणाची योग्य अशी सोय नाही, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगने 11 आयटीआयची संलग्नता काढली आहे, याकडे आमदार रोहन खंवटे यांनी लक्ष वेधले. नरेश सावळ म्हणाले की, आयटीआयमध्ये नवे अभ्यासक्रम येण्याची गरज आहे . (प्रतिनिधी)