पान ५ : मडगावातील वकिलांचा कामकाजावरील बहिष्कार मागे
By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST
मडगाव : याचिकेदाराची गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षिण गोवा ॲडव्होकेट असोसिएशनने मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष वकील राजीव गोम्स यांनी ही माहिती दिली. याचिकादारांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमचा पूर्वीचा निर्णय मागे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी या संघटनेने बैठक बोलावून कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी बहुतांश वकिलांनी न्यायालयीन कामकाजात भाग घेतला नव्हता.
पान ५ : मडगावातील वकिलांचा कामकाजावरील बहिष्कार मागे
मडगाव : याचिकेदाराची गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षिण गोवा ॲडव्होकेट असोसिएशनने मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष वकील राजीव गोम्स यांनी ही माहिती दिली. याचिकादारांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमचा पूर्वीचा निर्णय मागे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी या संघटनेने बैठक बोलावून कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी बहुतांश वकिलांनी न्यायालयीन कामकाजात भाग घेतला नव्हता.मडगावचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बॉस्को रॉबर्ट्स यांची बदली झाल्याने या संघटनेने निषेध व्यक्त केला होता. नुवेचे आमदार मिकी पाशेको हे फरार असताना ते संरक्षणमंत्र्यांच्या १0 अकबर रोडवरील निवासस्थानात दिसले होते, अशी माहिती ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी न्यायालयात दिल्यानंतर न्या. रॉबर्ट्स यांनी या निवासस्थानाची झडती घेण्याचा आदेश दिला होता. नंतर सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. रॉबर्ट्स यांनी हा आदेश जारी केल्यामुळे त्यांची बदली करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने पावले उचलली, असा दावा या संघटनेने केला होता. रॉबर्ट्स यांच्या जागी अनिल स्कारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या या जागेवर बदलीबाबतही संघटनेने आक्षेप घेऊन स्कारिया यांची मडगावचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदावर नियुक्ती झाल्यास न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहू, असा निर्णय घेतला होता. (प्रतिनिधी)