शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पान 4- बॅँक ऑफ इंडिया चोरीप्रकरणी तपास शून्य

By admin | Updated: July 31, 2015 23:03 IST

म्हापसा : येथील बॅँक ऑफ इंडियाच्या शाखेत 22 जुलै रोजी झालेल्या चोरी प्रकरणाची 10 दिवसांनंतर तपासात कोणत्याच प्रकारची प्रगती नसल्याचे दिसून आले आहे.

म्हापसा : येथील बॅँक ऑफ इंडियाच्या शाखेत 22 जुलै रोजी झालेल्या चोरी प्रकरणाची 10 दिवसांनंतर तपासात कोणत्याच प्रकारची प्रगती नसल्याचे दिसून आले आहे.
चोरट्यांनी कॅशियरच्या चेंबरमधून त्याच्या नकळत 12 लाख 10 हजार रुपये असलेली पैशांची बॅग दिवसाढवळ्या लांबवली होती. या घटनेनंतर कर्नाटक येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तामिळनाडूतील मधुसूदन एम या चोरट्याला काणकोण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला म्हापसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपी मधुसूदन याने दिलेल्या माहितीच्या आधारावर एक पथक मागील आठवड्यात तामिळनाडू येथे बाकी संशयितांचा शोध घेण्यासाठी गेले होते; परंतु पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने पथक खाली हात राज्यात परतले.
म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार वेर्णेकर यांना विचारले असता, तपासकामात कोणत्याच प्रकारची प्रगती नाही. तामिळनाडूत गेलेले पथक परत आले असून चोरलेली रक्कम अजूनपर्यंत ताब्यात मिळाली नसल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित पथक तामिळनाडूला शोध कार्यासाठी गेले होते. मात्र, पथकाला आरोपीचे घर बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे चोरटे सापडू शकले नाहीत; पण अटक केलेल्या चोरट्याने त्याच्या इतर साथीदारांची विस्तारित माहिती, नावे पोलिसांना दिली आहेत. त्याआधारे तपासकाम सुरू असल्याची माहिती वेर्णेकर यांनी दिली. (खास प्रतिनिधी)