पान 4- बेकायदा खनिज वाहतूकप्रकरणी आरोपींना जामीन
By admin | Updated: July 31, 2015 23:54 IST
सावर्डे : बेकायदेशीरपणे खनिज वाहतूक करणार्या प्रकरणात गुरुवारी (दि. 30) अटक केलेल्या दोन्ही आरोपींना केपे न्यायालयाने जामीन दिले, तर मुख्य आरोपी गौतम ऊर्फ श्याम भंडारी अजून फरार आहे.
पान 4- बेकायदा खनिज वाहतूकप्रकरणी आरोपींना जामीन
सावर्डे : बेकायदेशीरपणे खनिज वाहतूक करणार्या प्रकरणात गुरुवारी (दि. 30) अटक केलेल्या दोन्ही आरोपींना केपे न्यायालयाने जामीन दिले, तर मुख्य आरोपी गौतम ऊर्फ श्याम भंडारी अजून फरार आहे.सविस्तर माहितीनुसार, सुमारे 3 लाख रुपये किमतीचे मँगनिज खनिज धडे-सावर्डे येथील श्याम ऊर्फ गौतम भंडारी यानेआपले काका प्रभाकर भंडारी यांच्या रिवण येथील खाणीवरून कुडचडे येथे आणले होते. कुडचडे पोलिसांनी ट्रकासह माल जप्त केला. या प्रकरणात ट्रकचालक विनोद नाईक व अरमान बेकले यांना अटक केली होती. केपे न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. कुडचडेचे निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर तपास करीत आहेत.दरम्यान, कुडचडे पोलिसांनी यासंदर्भात खाण संचालकांना पत्र पाठविले असून खाण खात्याचे अधिकारी रिवण येथे जाऊन पाहणी करणार आहेत.(लो. प्र.)