पान ३ - पी - वझरी येथील बंधारा शेतकर्यांना फायदेशीर
By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST
हणखणे : वझरी-पेडणे येथे जलस्रोत खात्यातर्फे नदीच्या फाट्यावर बंधारावजा फुटब्रीज बांधण्यात आला आहे. याचा लाभ वझरी भागातील १५० शेतकर्यांना होईल, अशी माहिती वझरी ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश नाईक यांनी दिली. जलस्रोत खात्यातर्फे मडकई ते गोठणवाडा दरम्यान येथील नदीच्या फाट्यावर हा बंधारा बांधला. यापूर्वी या भागातील शेतीत त्या फाट्यातून खारेपाणी घुसत असल्याने शेती करणे शक्य नव्हते. याची दखल घेऊन वझरी पंचायत, जलस्रोत खात्यातर्फे बंधारा बांधण्यात आला. फुटब्रीजमुळे लोकांना नदी पार करून शेतात जाणे शक्य होईल. याबद्दल शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या बंधार्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती नीलेश नाईक यांनी दिली. (प्रतिनिधी)
पान ३ - पी - वझरी येथील बंधारा शेतकर्यांना फायदेशीर
हणखणे : वझरी-पेडणे येथे जलस्रोत खात्यातर्फे नदीच्या फाट्यावर बंधारावजा फुटब्रीज बांधण्यात आला आहे. याचा लाभ वझरी भागातील १५० शेतकर्यांना होईल, अशी माहिती वझरी ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश नाईक यांनी दिली. जलस्रोत खात्यातर्फे मडकई ते गोठणवाडा दरम्यान येथील नदीच्या फाट्यावर हा बंधारा बांधला. यापूर्वी या भागातील शेतीत त्या फाट्यातून खारेपाणी घुसत असल्याने शेती करणे शक्य नव्हते. याची दखल घेऊन वझरी पंचायत, जलस्रोत खात्यातर्फे बंधारा बांधण्यात आला. फुटब्रीजमुळे लोकांना नदी पार करून शेतात जाणे शक्य होईल. याबद्दल शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या बंधार्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती नीलेश नाईक यांनी दिली. (प्रतिनिधी)फोटो : मडकई-वझरी येथे बांधलेला बंधारावजा फुटब्रीज. (महादेव च्यारी) १६०६-एमएपी-११