पान 3 :
By admin | Updated: September 9, 2015 01:42 IST
कुंकळ्ळीतील हुतात्मा स्मारक प्रकल्प
पान 3 :
कुंकळ्ळीतील हुतात्मा स्मारक प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेतमडगाव : कुंकळ्ळी पालिकेने सुवर्णजयंती योजनेअंतर्गत उभारलेले हुतात्मा स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन कॉँग्रेस सरकारने गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवीवर्षानिमित्त पालिकेला दोन कोटींचा निधी दिला होता. या निधीतून हुतात्मा स्मारक, हेल्थ क्लब व जिमखाना प्रकल्प उभारण्याचे पालिकेने ठरविले होते. या दोन्ही प्रकल्पांची निविदाही जाहीर झाली होती. तत्कालीन नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांच्या हस्ते या दोन्ही प्रकल्पांची कोनशीलाही बसविण्यात आली होती. पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात लढा दिलेल्या सोळा महानायकांच्या स्मरणार्थ 52 लाख रुपये खर्चून उभारलेले हुतात्मा स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 15 जुलैला उद्घाटन होणार होते; परंतु काही कारणाने हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी विद्युत उपकरणे व इल्युमिनेशनचे काम बाकी राहिलेले आहे. पालिकेने इल्युमिनेशनच्या कामासाठी पालिका संचालनालयाकडे परवानगी मागितल्यास दोन महिने उलटले तरी नगरविकास खात्याकडून या कामासाठी परवानगी न मिळाल्यामुळे ते काम रेंगाळले असल्याचे पालिका सूत्रानी सांगितले. तसेच सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून व्यायामशाळा व हेल्थ क्लब उभारण्याचे कामही तसेच सोडून दिलेले आहे. हे प्रकल्प कधी मार्गी लागणार या प्रतीक्षेत लोक आहेत. (प्रतिनिधी)