पान २ : टॅक्सीचालकांनी पुकारलेला संप मागे
By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST
बार्देस : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने उत्तर व दक्षिण गोवा टॅक्सी ओनर असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, दि. १६ रोजी राज्यातील सर्व काळ्या-पिवळ्या टॅक्सी बंद ठेवण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे.
पान २ : टॅक्सीचालकांनी पुकारलेला संप मागे
बार्देस : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने उत्तर व दक्षिण गोवा टॅक्सी ओनर असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, दि. १६ रोजी राज्यातील सर्व काळ्या-पिवळ्या टॅक्सी बंद ठेवण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे.१३ रोजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची बोलणी झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष वासुदेव आर्लेकर यांनी कळंगुट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांच्या समवेत उत्तर गोवा ओनर असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र वेंगुर्लेकर, सचिव विनायक नानोस्कर, खजिनदार संजय वेंगुर्लेकर, सदस्य वीरेंद्र कोरगावकर व बाप्पा कोरगावकर उपस्थित होते. आर्लेकर यांनी सांगितले की, पर्यटक टॅक्सीमुळे पिढीजात चालवत असलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांवर परिणाम होतो. त्यांना म्हणावा तसा धंदा मिळत नाही. त्यामुळे आमचा संसार कसा चालवावा हा प्रश्न निर्माण होतो. पर्यटक टॅक्सीचालक मिळेल तशी भाडी मारतात आणि काही पैसेवाले लोकही पर्यटक टॅक्सी चालवतात तर काहीजण सरकारी आणि निमसरकारी नोकर्या करणारे लोक आपल्या पत्नीच्या नावे पर्यटक टॅक्सीचा व्यवसाय चालवितात, त्यामुळे आमच्या व्यवसायावर खोट बसली आहे. सध्या उत्तर गोव्यात १० हजार टॅक्सीचालक आपला व्यवसाय करतात; पण पर्यटक टुरिस्ट टॅक्सीचालकांना आरटीओ व ट्राफीक पोलिसांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आमच्या १० हजार कुटुंबाला रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. पर्यटक टॅक्सीचालकांना येथील काही व्यावसायिक भाडी मिळवून देतात. त्यामुळे आम्हाला व्यवसाय मिळू शकत नाही. या व्यवसायाबाबत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना आमचे गार्हाणे सांगण्यात आल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती करून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला हा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही १६ रोजी पुकारलेला संप तात्पुरता मागे घेण्यात आल्याचे सांगितले. सचिव विनायक नानोस्कर यांनी सांगितले की गोवा हे लहान राज्य आहे. या राज्यात काळ्या-पिवळ्या टॅक्सींचा व्यवसाय सुरू आहे आणि त्यात या पर्यटक टॅक्सीचालकांचाही धुडगूस असतो त्यामुळे आम्हालाच आमची वाहने ठेवण्यास जागा कमी पडते. त्यात पर्यटक टॅक्सी ठेवल्या जातात. आम्ही अजूनपर्यंत टॅक्सी कमी पडू दिल्या नाही आणि मग या पर्यटक टॅक्सींना परवाना कसा मिळतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही एका किलोमीटर मागे वाहनानुसार पैसे आकारतो. आमच्या टॅक्सीचे दर कुठेही लावण्यास आमची तयारी असल्याचेही ते म्हणाले. तसेच या वेळी दक्षिण गोव्याचेही टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष लुईस फर्नांडिस व सचिव रॉग फर्नांडिस, तसेच इतर सदस्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)चौकट बेकायदा व्यवसाय करणार्यांवर कारवाई होणार : लोबोकळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांना सांगितले आपण टॅक्सीचालकांचा प्रश्न घेऊन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यावर त्यांनी पर्यटक टॅक्सीवाल्याबाबत विचारणा करून टॅक्सीचालकांना न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगितले. तसेच पर्यटक टॅक्सीचालकाचे आरटीओ व ट्राफीक पोलीस यांच्याशी धागेदोरे असल्याने काहीजण बेकायदा वाहने चालवितात. त्यावर वाहतूक खात्याने योग्य ती कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी आमदार लोबो यांनी केली. सरकारने टॅक्सीचालकांना विनामूल्य पार्किंग करण्यासाठी जागा, स्मार्टकार्ड, शौचालय व इतर सोयी देण्याचे कबूल केले होते; पण त्यांना त्या अजूनपर्यंत मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. फोटो : कळंगुट येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा टॅक्सी ओनर असोसिएशनचे अध्यक्ष वासुदेव आर्लेकर पत्रकारांना माहिती देताना. तर दुसर्या छायाचित्रात उपस्थित टॅक्सीचालक-मालक. (प्रकाश धुमाळ) १५०७-एमएपी-०३, ०४