पान १ -सरकार्यवाहपदी भय्याजी जोशींची फेरनिवड
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
सरकार्यवाहपदी भय्याजी जोशींची फेरनिवड
पान १ -सरकार्यवाहपदी भय्याजी जोशींची फेरनिवड
सरकार्यवाहपदी भय्याजी जोशींची फेरनिवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : सलग तिसर्यांदा निवडनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांची तिसर्यांदा फेरनिवड झाली आहे. नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत जोशी यांच्या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले़ सरकार्यवाह हे सरसंघचालकानंतर दुसर्या क्रमाकांचे महत्त्वाचे पद आहे़ रा़ स्व़ संघाच्या सरकार्यवाहपदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती़ सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या नावाचीही संघ वर्तुळात चर्चा होती. मात्र, जोशी यांनाच या पदावर कायम ठेवण्यात आले आहे़ बाळासाहेब देवरस , हो. वे. शेषाद्री यांनी याअगोदर तीनहून अधिकवेळा सरकार्यवाहपदाची जबाबदारी पार पाडली आहे. (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़प्रचारक ते सरकार्यवाह भय्याजी जोशी हे मूळचे इंदूरचे असून, त्यांचा जन्म १९४७ सालचा आहे. जोशी यांनी ठाणे शहरात शिक्षण पूर्ण करत कला शाखेची पदवी संपादन केली. लहानपणापासूनच त्यांची नाळ संघाशी जुळली़ १९७५ साली प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मार्च २००९ मध्ये सरकार्यवाहपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली.़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़फोटो१४ भय्याजी जोशी या नावाने फोटो पाठविण्यात आला आहे़