पान १- लोकल अपघात - जोड
By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST
ब्रेक लागलाच नाही - मोटरमन
पान १- लोकल अपघात - जोड
ब्रेक लागलाच नाही - मोटरमनब्रेक न लागल्यानेच चर्चगेट लोकलचा अपघात झाल्याचा जबाब मोटरमनने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अपघात झाल्यानंतर मोटरमनचा मोबाईल तपासला असता यातील सर्व कॉल डिटेल्स नष्ट केले आहेत. त्यामुळे मोटरमन फोनवर बोलत होता का, याचाही तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. चर्चगेट स्थानकात आल्यानंतर प्रत्येक गाडीचा वेग हा ताशी ३0 किमी एवढा ठेवणे गरजचे आहे. मात्र भाईंदरवरून आलेल्या या लोकलचा वेग तेव्हा ताशी ३६ किमी होता. त्यामुळे या लोकलच्या ब्रेकमध्ये बिघाड झाला की काही अन्य कारण आहे, याचा तपास रेल्वेकडून घेण्यात येत आहे.इमर्जन्सी ब्रेक वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही न लागल्याने अपघात झाल्याचे मोटरमन एल. एस. तिवारी यांनी रेल्वेला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.............................................एल. एस. तिवारी गेली २५ वर्षे मोटरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पहिली १५ वर्ष लोको पायलट म्हणून काम केले. त्यानंतर मोटरमन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे काम व्यवस्थित असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.