पान १/ देशात जातीय दंगली वाढल्या
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
देशात जातीय दंगली वाढल्या
पान १/ देशात जातीय दंगली वाढल्या
देशात जातीय दंगली वाढल्याउत्तर प्रदेशात सर्वाधिक: गुजरात, कर्नाटकात घटनवी दिल्ली : २०१५ या वर्षातील सहा महिन्यांच्या काळात गत वर्षातील याच काळाच्या तुलनेत सांप्रदायिक दंगलींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या जूनपर्यंत देशात सांप्रदायिक दंगलीच्या ३३० घटना घडल्या, ज्यात ५१ लोकांना आपला जीव गमवावा लागला असून १०९२ जण जखमी झाले आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१५ ते जून २०१५ या सहा महिन्यांत सांप्रदायिक दंगलीच्या ३३० घटना घडल्या. २०१४ मध्ये पहिल्या सहा महिन्यांत अशा २५२ घटना घडल्या होत्या. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमधील सांप्रदायिक दंगलीच्या घटनांमध्ये ३३ जण मृत्युमुखी पडले होते. २०१४ या वर्षभरात देशात ६४४ दंगली घडल्या आणि त्यात ९५ जण मारले गेले तर १९२१ जखमी झाले होते.समाजवादी पार्टीचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशात जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांत सर्वाधिक ६८ दंगली घडल्या आणि त्यात १० जण मारले गेले तर २२४ जखमी झाले. राज्यात २०१४ मध्ये १३३ दंगली घडल्या होत्या आणि त्यात २६ जण मारले गेले होते. बिहारमध्ये गेल्या सहा महिन्यांत सांप्रदायिक दंगलीच्या ४१ घटना घडल्या आणि त्यात १४ जणांना जीव गमवावा लागला तर १६९ जखमी झाले.भाजपाचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये गेल्या सहा महिन्यांत सांप्रदायिक दंगलीच्या २५ घटना घडल्या आणि त्यात ७ जण मारले गेले तर ७९ जखमी झाले. गेल्या वर्षी राज्यात दंगलीच्या ७४ घटना घडल्या होत्या, ज्यात ७ जण मारले गेले होते आणि २१५ जखमी झाले होते.काँग्रेसशासित कर्नाटकात गेल्या सहा महिन्यांत ३६ दंगली घडल्या, ज्यात २ जण मारले गेले तर १२३ जखमी झाले. या राज्यातील गतवर्षीचा दंगलीचा आकडा ७३ आहे. त्यात ६ जण मारले गेले होते आणि १७७ जखमी झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)चौकटमहाराष्ट्राचा उतरता आलेखभाजपाचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात गेल्या जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांच्या काळात सांप्रदायिक दंगलीच्या ५९ घटना घडल्या. यात ४ जण मारले गेले आणि १९६ जखमी झाले. २०१४ यावर्षी महाराष्ट्रात ९७ सांप्रदायिक दंगली घडल्या, ज्यात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला तर १९८ जण जखमी झाले होते.