शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावती’मध्ये हस्तक्षेप नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 22:38 IST

बॉलीवूडचा चित्रपट ‘पद्मावती’च्या प्रदर्शनास प्रतिबंध लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांच्या पीठाने स्पष्ट केले की, चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याबाबत सेन्सॉर बोर्डाकडे पर्याप्त दिशानिर्देश आहेत. सेन्सर बोर्डाचे कर्तव्य आम्ही आमच्या हातात घेऊ शकत नाहीत.    

ठळक मुद्दे चित्रटातून इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचा आरोप        

 नवी दिल्ली : बॉलीवूडचा चित्रपट ‘पद्मावती’च्या प्रदर्शनास प्रतिबंध लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांच्या पीठाने स्पष्ट केले की, चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याबाबत सेन्सॉर बोर्डाकडे पर्याप्त दिशानिर्देश आहेत. सेन्सर बोर्डाचे कर्तव्य आम्ही आमच्या हातात घेऊ शकत नाहीत.    

           सिद्धराजसिंह एम. चुडासामा आणि ११ अन्य लोकांच्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करीत होते. या याचिकेत अशी विनंती करण्यात आली होती की, चित्रपटाच्या पटकथेची तपासणी करण्यासाठी इतिहासकारांच्या एका समितीची स्थापना करण्यात यावी. या चित्रपटातील इतिहासाबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात यावी. 

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी राणी पद्मावती यांच्या जीवनावर हा हिंदी चित्रपट बनविला आहे. काही जणांनी यावर आक्षेप घेत म्हटले आहे की, निर्मात्यांनी या चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण केले आहे. राजस्थान सरकारची समिती     ‘पद्मावती’ चित्रपटाबाबतचे आक्षेप आणि वाद या पार्श्वभूमीवर सरकार एक समिती स्थापन करण्याचा विचार करीत आहे, अशी माहिती राजस्थान सरकारमधील गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी दिली. या समितीत इतिहासकारांचा समावेश करण्यात येणार आहे. राजपूत समाजातील नेते आणि काही संघटनांनी पद्मावती चित्रपटाबाबत आक्षेप घेत ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड झाल्याचा आरोपही केला आहे. या चित्रपटावर प्रतिबंध आणण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. भाजपच्या आमदार आणि जयपूर राजघराण्याच्या सदस्य दिया कुमारी, करणी सेना, बजरंग दल आणि अन्य काही संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप नोंदविला आहे.