शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Coronavirus: पद्मभूषण पंडित राजन मिश्रांचं ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 20:56 IST

राजन मिश्रा भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. २००७ मध्ये भारत सरकारकडून कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारनं गौरवण्यात आलं होतं.

नवी दिल्ली – पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने रविवारी निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. दुपारी त्यांना ह्दयसंदर्भातील समस्येमुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना अपयश आलं आणि राजन मिश्रा यांचा प्राणज्योत मालावली.

कोण होते राजन मिश्रा?

राजन मिश्रा भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. २००७ मध्ये भारत सरकारकडून कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारनं गौरवण्यात आलं. बनारस घराण्याशी ते संबंधित होते. १९७८ मध्ये श्रीलंकेत त्यांनी पहिला संगीत कार्यक्रम केला होता. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्विझरलँड, ऑस्ट्रिया, संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटेन, यूएसएसआर, कतार, बांगलादेशसह अनेक देशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.

 

राजन-साजन मिश्रा यांची प्रसिद्ध जोडी

राजन आणि साजन मिश्रा हे दोघं भाऊ होते आणि एकत्र संगीताचे कार्यक्रम करत होते. दोन्ही भावांनी जगात प्रसिद्धी मिळवली होती. पंडित राजन आणि साजन मिश्रा यांच्या मते, मनुष्याचे शरीर पाच तत्वांनी मिळून बनते तसं संगीताचे सात सूर सारेगामापाधानी पशुपक्षांच्या आवाजाने बनतात. काही वर्षापूर्वी दोन्ही भावांनी नैसर्गिक संकटासाठी मनुष्य जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. प्रत्येकाने आपली मानसिकता बदलायला हवी आणि निसर्गाची साथ द्यायला हवी असं ते नेहमी म्हणत होते.