शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पी. चिदंबरम यांच्या काश्मीर 'स्वातंत्र्या'वरील टिपण्णीवरून काँग्रेसनं झटकले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 08:15 IST

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून काँग्रेसनं हात झटकले आहेत.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून काँग्रेसनं हात झटकले एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत म्हणजे पक्षाची भूमिका होत नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं.1947ची काँग्रेसची सदोष नीतीच काश्मीरच्या समस्येला जबाबदार आहे. काश्मीरची समस्या ही काँग्रेसकडून वारशानं चालत आली

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून काँग्रेसनं हात झटकले आहेत. एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत म्हणजे पक्षाची भूमिका होत नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं. चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला आणखी स्वायत्तता देण्याची मागणी केली होती. त्याचा भाजपानं निषेध नोंदवला आहे. जम्मू-काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग आहे आणि ते कायम राहील. एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत हे काँग्रेसचंही मत असल्याचं मानणं योग्य ठरणार नाही, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत.परंतु भाजपा चिदंबरम यांच्या या विधानावरून आक्रमक झालीय. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी चिदंबरम यांच्यासह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही धारेवर धरलं आहे. चिदंबरम यांचं वक्तव्य हे भारताला तोडण्याचं आहे, हे धक्कादायक व भयंकर आहे. पी. चिदंबरम हे भारताला तोडण्याची भाषा करत असून, जम्मू-काश्मीरमध्ये जवानांची हत्या करणा-या दहशतवाद्यांना ते समर्थन देत आहेत. जेणेकरून जम्मू-काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडेल, असंही स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. चिदंबरम यांचं विधान हे काँग्रेस पक्षाची मानसिकता दर्शवत असल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसला चांगलंच फटकारलं आहे. त्याप्रमाणेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनीही चिदंबरम यांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, 1947ची काँग्रेसची सदोष नीतीच काश्मीरच्या समस्येला जबाबदार आहे. काश्मीरची समस्या ही काँग्रेसकडून वारशानं चालत आली आहे. स्वतःच्या जुन्या चुकीच्या धोरणांतून शिकण्याऐवजी काँग्रेस देशातील संकटं वाढवण्याचं काम करतोय. काँग्रेस पूर्ण देशासोबत गद्दारी करतोय. तो जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना पाठिंबा देतोय. स्वातंत्र्य किंवा स्वायत्ततेसंदर्भात चिदंबरम यांनी जी भूमिका मांडली आहे ती भारताच्या राष्ट्रीय हितांना बाधा पोहोचवणारी आहे, असंही जेटली म्हणाले आहेत.शनिवारी गुजरातमधील राजकोटमध्ये एका कार्यक्रमात चिदंबरम यांनी काश्मीरसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. जम्मू-काश्मीरच्या लोकांशी संवाद साधल्यानंतर मला असं जाणवलं की, जेव्हा ते स्वातंत्र्याची मागणी करतात तेव्हा खरं तर तेथील लोकांना स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता हवी आहे. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसJammu Kashmirजम्मू काश्मिर