शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पी. चिदम्बरम अखेर १0६ दिवसांनी तुरुंगातून बाहेर, सुप्रीम कोर्टाचा जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 06:05 IST

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली : ‘मनी लॉड्रिंग’च्या आरोपाखाली अटक केलेले माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. त्यामुळे १०६ दिवस तुरुंगात असलेले चिदम्बरम रात्री बाहेर आले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. ते गुरुवारी संसदेत जाणार आहेत.त्यांची तिहार कारागृहातून सुटका झाली, तेव्हा काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते. ते बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचा जयजयकार केला.या आधी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्याविरुद्ध केलेले अपील मंजूर करून न्या.आर. भानुमती, न्या. ए.एस. बोपण्णा व न्या. ऋषिकेष रॉय यांच्या खंडपीठाने दोन लाख रुपयांच्या जामिनावर चिदम्बरम यांच्या सुटकेचा आदेश दिला. तो देताना त्यांचा पासपोर्ट सीबीआयकडे जमा राहील, लेखी पूर्वानुमती न घेता त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. गरज असेल तेव्हा तपासासाठी जावे लागेल. तपासात ढवळाढवळ करता येणार नाही व साक्षीदारांवर प्रभाव टाकता येणार नाही, प्रसिद्धी माध्यमांशी बोलता येणार नाही, या अटी घातल्या आहेत.त्यांचा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आर्थिक गुन्हे गंभीर स्वरूपाचे असतात हे मान्य केले तरी आरोपीला जामीनच देऊ नये, अशी तरतूद नाही. ईडीला चौकशीसाठी चिदम्बरम यांची ४५ दिवसांहून अधिक काळ कोठडी मिळाली होती. राहिलेला तपास त्यांना बोलावूनही पूर्ण करता येईल. जामिनाच्या वेळी न्यायालयाने आरोपी दोषी आहे की नाही हे ठरवायचे नसते, याचे स्मरणही खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाला करून दिले.पोटदुखीने आजारीसीबीआयने २१ आॅगस्ट रोजी चिदम्बरम यांना दिल्लीतील घरातून अटक केली होती. त्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर ईडीने १६ आॅक्टोबर रोजी अटक केली.विशेष न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन नाकारल्याने या दोन्ही प्रकरणांत ७४ वर्षांच्या चिदम्बरम यांना १०६ दिवस कोठडीत राहावे लागले. त्या काळात त्यांना पोटदुखीने दोनदा आजारपणही आले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम