शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

रेल्वेत आॅक्सिजन सिलिंडर सक्तीचे, आजारी प्रवाशांंची सोय हवी - सुप्रीम कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 04:58 IST

श्वास घेण्यास त्रास होणा-या प्रवाशांना निकड आली तर कृत्रिम श्वासोच्छ्वासाची सोय असावी यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत आॅक्सिजन सिलिंडर ठेवावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : श्वास घेण्यास त्रास होणा-या प्रवाशांना निकड आली तर कृत्रिम श्वासोच्छ्वासाची सोय असावी यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत आॅक्सिजन सिलिंडर ठेवावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.प्रवासी आजारी पडल्यास त्याच्यावर गाडीतच उपचार करण्याची सुयोग्य व्यवस्था रेल्वेने अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टरांच्या सल्ल्याने उपलब्ध करावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले. राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका निकालाविरुद्ध केंद्र सरकारचे अपील निकाली काढताना सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.आजारी पडणाºयांवर उपचार व्हावेत, यासाठी लांब पल्ल्याच्या गाडीत एक डॉक्टर, एक नर्स व एक मदतनीस यांचे पथक ठेवावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. ते अव्यवहार्य व खर्चीक आहे, हे पटल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुधारित आदेश दिला.न्यायालयाने सांगितले की, प्रवाशाने तब्येत ठीक नसल्याने उपचाराची इच्छा टीसी वा मदतनीसाकडे व्यक्त केल्यास इस्पितळाची सोय असलेल्या पुढच्या रेल्वे स्टेशनला कळविणे व गाडी तेथे पोहोचताच प्रवाशास संबंधित इस्पितळात घेऊन जाणे ही रेल्वेची जबाबदारी असेल.केंद्राने सांगितले की, धावत्या गाडीमध्ये आजारी प्रवाशांना जागीच उपचार देण्यासाठी रेल्वेने एक प्रयोग करून पाहिला. पण तो यशस्वी झाला नाही. गंभीर आजारी प्रवाशाच्या तपासणीसाठीची उपकरणे धावत्या गाडीत नीट चालत नाहीत, असे दिसून आले.रेल्वेने न्यायालयाच्या निदर्शनास आणले की, मोठ्या रेल्वे स्टेशनवर औषधांच्या दुकानात डॉक्टर ठेवण्याचा प्रयोगही करून पाहिला. परंतु त्यास फारसे यश आले नाही. देशभरात प्रमुख रेल्वेमार्गांपासून ८० ते १२० किमी अंतरात रेल्वेची सुमारे ६०० इस्पितळे व दवाखाने आहेत. तेथे रेल्वे कर्मचाºयांखेरीज प्रवासात आजारी होणाºया प्रवाशांवरही उपयारांची सोय होऊ शकते.रेल्वेने आणखीही काही पावले उचलणे गरजेचे आहे, असे नमूद करून न्यायालयाने म्हटले की, प्रवासात आजारी होणाºया प्रवाशांवर धावत्या गाडीत लगेच उपचार करण्यासाठी काय करता येईल याविषयी रेल्वेने ‘एम्स’च्या वरिष्ठ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व ते ज्या काही सूचना करतील त्याप्रमाणे व्यवस्था करावी.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतRailway Passengerरेल्वे प्रवासी