शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मी माझ्या इच्छेनं मुसलमान, कोणाचीही जबरदस्ती नाही, ओवैसींचा रामदेव बाबांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 13:13 IST

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी योगगुरू रामदेव बाबांनी 'प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, या विधानावर आक्षेप नोंदवला आहे.

ठळक मुद्देओवैसी यांनी योगगुरू रामदेव बाबांनी केलेल्या 'प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. आम्ही कोणाच्याही धर्माविरोधात नाही. परंतु दुसऱ्यांवर स्वतःचा धर्म लादणे चुकीचे आहे. भारतात आम्ही मुसलमान स्वतःच्या इच्छेनं झालो आहोत. कोणीही आमच्या पूर्वजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास बाध्य केलेलं नव्हतं.

नवी दिल्ली- एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी योगगुरू रामदेव बाबांनी केलेल्या 'प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. आम्ही कोणाच्याही धर्माविरोधात नाही. परंतु दुसऱ्यांवर स्वतःचा धर्म लादणे चुकीचे आहे. अशी विधानं संघ परिवाराकडून वारंवार केली जातात. भारतात आम्ही मुसलमान स्वतःच्या इच्छेनं झालो आहोत. कोणीही आमच्या पूर्वजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास बाध्य केलेलं नव्हतं. 'प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे अयोध्येतच होणार आहे. अयोध्येत नाही तर काय व्हॅटिकन सिटी किंवा मक्का मदिनाला होणार का? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे हे निर्विवाद सत्य आहे. प्रभू राम हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही वंशज आहेत,' असं रामदेव बाबा यांनी म्हटलं होतं.त्यावर ओवैसी म्हणाले, असं म्हणून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता. भारताचं संविधान मोठं आहे की तुमची विचारसरणी?, संविधान आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार देतो. तुम्ही एखाद्याची चुकीची प्रतिमा समाजात पसरवत आहात. तुम्ही असे का करत आहात ?, तसेच ओवैसींना भारतरत्न पुरस्काराबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दलही विचारण्यात आले. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी 'भारतरत्न' पुरस्कारवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मी बोललेलो त्यात चुकीचं काय आहे ?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी ओवैसी म्हणाले होते,  'मला सांगा आतापर्यंत ज्यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे, त्या यादीमध्ये किती दलित, आदिवासी, मुस्लिम, गरीब, उच्च जातीतील लोक आणि ब्राह्मणांचा समावेश आहे?. बाबासाहेबांनाही मनापासून भारतरत्न पुरस्कार दिला गेला नाही. अगतिकतेच्या परिस्थितीत त्यांना पुरस्कार देण्यात आला', असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपासहीत काँग्रेसवरही निशाणा साधला होता. 'मी तुम्हाला कापून टाकेन'भाजपा आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना ओवैसी आक्रमक झाले होते. मतविभाजनाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, ''मी प्रक्षोभक भाषणं करतो, मतांचं विभाजन करतो, असा माझ्यावर वारंवार आरोप केला जातो. तर तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची मतं कापत नाहीय, मी तुम्हालाच कापून टाकेन'', असा धमकीवजा इशाराही ओवैसी यांनी दिला होता.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी