शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा भडका! पॅरासिटामॉलसह तब्बल ८०० औषधांचे दर वाढणार; १ एप्रिलपासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 11:34 IST

आरोग्याची काळजी घेणं आता आणखी महाग होणार

मुंबई: इंधन दरवाढ सुरू असताना आता औषधांच्या किमतीदेखील वाढणार आहेत. आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये १ एप्रिलपासून वाढ होणार आहेत. जवळपास ८०० औषधांचे दर १० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं महाग होणार आहे.

उच्च रक्तदाब, ताप, हृदयरोग, त्वचा रोगाच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी औषधं महागणार आहेत. वेदनाशामक आणि एँटी बायोटिक फिनायटोईन सोडियम, मेट्रोनिडाझोलसारखी आवश्यक औषधांवरही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथरिटीनं (एनपीपीए) सांगितलं. औषधांच्या किमती वाढवल्या जाव्यात अशी मागणी कोरोना संकट आल्यापासून या क्षेत्रातील कंपन्या करत होत्या. अखेर एनपीपीएनं औषधांचे दर १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आवश्यक औषधांच्या किमती वाढतील. कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचे दरही वाढणार आहेत.  

टॅग्स :medicineऔषधं