शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

मणिपुरात पुन्हा भडका! तीन ठार; २४ तासांपासून गोळीबार सुरू, घरे पेटवून देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 06:13 IST

विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले.

इंफाळ : मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून शुक्रवारी रात्री विष्णूपूर जिल्ह्यात मैतेई समुदायातील तीन लोकांची हत्या करण्यात आली. तसेच कुकी समुदायातील लोकांच्या अनेक घरांना आग लावण्यात आली. राज्यातील अनेक भागात मागील २४ तासांपासून गोळीबार सुरू आहे. 

विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले. विष्णूपूर जिल्ह्यातील क्वाक्टा भागापासून दाेन किलोमीटरनंतर केंद्रीय सुरक्षा दलांनी बफर झोन तयार केला आहे. 

त्याआधी गुरुवारी सायंकाळी विष्णूपूरमध्ये अनेक भागांत गोळीबारानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. हिंसक जमावाची सुरक्षा दलांसोबत चकमक झडली. या भागात सुरक्षा दलांनी सात भूमिगत बंकर उद्ध्वस्त केले आहेत. (वृत्तसंस्था) 

मृतांमध्ये पिता-पुत्राचा समावेशशुक्रवारी रात्री मारल्या गेलेल्या ३ जणांत एका पिता-पुत्राच्या जोडीचा समावेश आहे. विष्णूपूरजवळील क्वाक्टा येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर झोपेतच गोळ्या झाडल्या. मारले गेलेले दुपारीच निर्वासित छावण्यातून घरी परतले होते. हत्याकांडाचे वृत्त आल्यानंतर क्वाक्टामध्ये मोठा जमाव जमला. चालून जाण्या आधीच जमावाला सुरक्षा दलांनी रोखले. यावेळी उडालेल्या चकमकीत पोलिसासह ३ जण जखमी झाले.

शिथिल केलेली संचारबंदी पुन्हा लागूविष्णूपूर जिल्ह्यातील दुसऱ्या आयआरबी युनिटच्या छावण्यांवर हिंसक जमावाने हल्ला करून शस्त्रास्त्रे व दारूगाेळा लुटून नेला. मणिपूर राइफल्सची दुसरी बटालियन आणि ७ टीयू  बटालियनची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा लुटण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. यावेळी सुरक्षा दले आणि हिंसक जमाव यांच्यात चकमक उडाली. हिंसाचारामुळे शिथिल करण्यात आलेली संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे.

१६० हून अधिक बळी मैतेई समुदायास अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या विरोधात कुकी समुदायाने सुरू केलेल्या आंदोलनातून मणिपुरातील संघर्ष निर्माण झाला. हिंसाचारात आतापर्यंत १६० पेक्षाही अधिक लोक ठार झाले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. मणिपुरात मैतेई समुदायाची संख्या सुमारे ५३ टक्के असून ते इम्फाळ खोऱ्यात राहतात. 

जनजीवन विस्कळीतमणिपुरातील समन्वय समितीने दिलेल्या मणिपूर बंदच्या हाकेमुळे शनिवारी जनजीवन विस्कळीत झाले. शाळा-महाविद्यालये तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सर्व व्यवहार बंद राहिले. पहाडी भागात मात्र बंदचा परिणाम दिसून आला नाही. समितीचे समन्वयक एल. बिनोद यांनी सांगितले की, सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार