शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेमुक्त प्रशासन ही कामगिरी आमची!

By admin | Updated: March 5, 2017 05:00 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाचे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांच्याशी मनमोकळी चर्चा केली.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाचे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. या वेळी त्यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या उपलब्धींसोबतच राष्ट्रपतिपदाची येती निवडणूक, स्मार्ट शहरांची योजना आणि इतरही अनेक मुद्द्यांचा ऊहापोह केला. सोबतच भाजपाविरुद्ध विरोधकांच्या एकजुटीवरही भूमिका स्पष्ट केली. माहिती व प्रसारण मंत्री या नात्याने तुम्ही केंद्र शासनाचे प्रवक्ते आहात. तीन वर्षांच्या कार्यकाळातील तुमची एखादी तरी मोठी उपलब्धी कोणती?नायडू : पंतप्रधानांनी तीन मंत्र दिले. सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन. मग मी त्यात माहितीचाही समावेश केला. आमचे सर्वांत मोठे यश म्हणजे आम्ही घोटाळेमुक्त सरकार दिले.

परंतु दिलेल्या आश्वासनानुसार तुम्ही एकाही व्यक्तीला तुरुंगात पाठविले नाही.

पूर्वीच्या सरकारने केलेल्या घोटाळ्यांवर सध्या मी काम करीत आहे.

तुम्ही तीन वर्षांपासून काम करीत आहात हे कसे कळेल?इतर काही करण्यापेक्षा लोकांची सेवा आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासच आम्ही प्राधान्य दिले आहे. तुम्ही वीजपुरवठ्याचीच परिस्थिती बघा. पूर्वी अंधारात असलेल्या १८ हजार खेडेगावांपैकी १२ हजार गावांमध्ये आता वीज आली आहे. उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये वीज खंडित होण्याची समस्या भूतकाळात जमा झाली. युरियासाठीची ओरड आता ऐकू येत नाही. याशिवाय शिष्यवृत्ती, पेन्शन, नुकसानभरपाई, एलपीजी गॅस सबसिडी, मनरेगा यांसह जवळपास सर्व सेवा थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत आल्या आहेत. एवढेच नाही, तर शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामुळे लोकांची बदलती मानसिकता आपल्याला दिसून येते. शिवाय बेटी बचाओ बेटी पढाओ, सर्वांसाठी आरोग्य, घरकूल योजनेचा लाभ लोक घेत आहेत. अशा शेकडो गोष्टी आहेत; ज्यांची यादी येथे देता येणार नाही.

आणि आता कुंडल्या उघड करण्याची वेळ आली का?कुंडल्या पूर्वीपासून आहेतच. आम्ही संस्थांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे, त्यात हस्तक्षेप करीत नाही. त्यांना त्यांचे काम करू द्या. त्यांच्याकडे सर्व आवश्यक ती माहिती आहे. शिवाय पूर्वीसारखे त्यांचे हातही आता बांधलेले नाहीत. त्यांनी स्वतंत्र आणि निर्भयपणे आपली जबाबदारी पार पाडावी अशीच आमची इच्छा आहे.

म्हणजे दोषींची तुरुंगात रवानगी करण्याची वेळ आली असे समजायला हरकत नाही?(स्मितहास्य करीत) याचा निर्णय तपास संस्थांनी घ्यायचा आहे.

परंतु राजकीय पक्ष तुमच्याविरोधात एकजूट होत आहेत. मोदींविरुद्ध इतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचे काय?याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचा विकास होतोय आणि विरोधकांना भीती वाटू लागली आहे. पूर्वी लोक म्हणत असत की हा उत्तर भारतीय आणि शहरी लोकांचा पक्ष आहे. परंतु आज आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो आहोत. जम्मू-काश्मीरसह ईशान्य आणि दक्षिणेतही आमची सरकारे आहेत. भाजपाची अत्यंत वेगवान वाटचाल होते आहे. यासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व कौतुकास पात्र आहे.

२०१४मध्ये या पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. आता मात्र ते एकत्र येत आहेत?त्यांना एकत्र येऊ देत. तुम्ही कमकुवत असाल तर हे करावेच लागणार. ते कृत्रिम आघाड्या करीत आहेत. ते दिल्लीत एकमेकांना मिठ्या मारतात आणि कोलकात्यात भांडतात. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे तेच उघड पडतील. आम्ही काहीच चुकीचे केलेले नाही. पण ते निराश झाले असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्यामुळेच ते आघाड्या करीत असले तरी लोक त्यांना धडा शिकवतील.

याचा अर्थ राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कुठल्याही आव्हानाचा सामना करावा लागेल असे आपणास वाटत नाही का?अशी कुठलीही अडचण निर्माण करण्याची त्यांची क्षमता आहे असे वाटत नाही. पुरेसा पाठिंबा मिळविण्यास आम्ही सक्षम आहोत. कुठल्याही परिस्थितीत सर्वसहमती व्हावी असेच आमचे प्रयत्न आहेत. सहमती झाली तर फारच चांगले. परंतु काही कारणास्तव ती होऊ शकली नाही तर बघू. वस्तुस्थिती ही आहे की भाजपा हा त्याच्या ११ कोटी सदस्यांसह जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. आणि याचे श्रेय पक्षाध्यक्ष अमित शाह यांना जाते. आमचे नेते नरेंद्र मोदी घराघरांत पोहोचले आहेत. ते दूरदृष्टीचे अन् धाडसी नेते आहेत. नोटाबंदीचाच निर्णय बघा! विरोधकांना त्यात धूळ चाखावी लागली.

काही बडी वर्तमानपत्रे यात गुंतली आहेत काय?याबाबत मी कुठल्याही निष्कर्षाप्रत आलेलो नाही. त्यानंतरच मी बोलेन. काही वृत्तवाहिन्यांचीही चौकशी सुरू आहे. कुठेही गैरप्रकार आढळत असल्यास त्यांच्या जाहिराती थांबविण्यास सांगितले आहे.

वृत्तपत्रांच्या खपाच्या घोटाळ्यासंदर्भात तुम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत असे समजते.कोणत्या वृत्तपत्राने खपाचे बनावट आकडे दिले याची आम्ही चौकशी करीत आहोत. हा निर्णय फारसा सुखावह नाही. पण एकूण व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी त्याची गरज आहे. त्यादृष्टीने वृत्तपत्राने वापरलेली वीज आणि त्यांची अंक छपाईची क्षमता हे आम्ही तपासत आहोत. त्यांना विजेची बिले सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लखनऊमधील एका मुद्रणालयात २९ वृत्तपत्रे छापली जातात. ही गोष्ट अशक्य वाटते. यापैकी काही लोकांवर कारवाईचे आदेश मी दिले आहेत. त्यामुळे वस्तुनिष्ठ आकडे देणाऱ्या वृत्तपत्रांचा निश्चित लाभ होईल.तुमचे सरकार दररोज एक नवी योजना आणते. पण त्याच्या अंमलबजावणीचे काय? स्मार्ट शहरे कुठे आहेत?अर्थातच! आमचे सर्व प्रकल्प योग्य मार्गावर असून, यशस्वीही ठरत आहेत. स्मार्ट शहरे ही काही एका रात्रीतून निर्माण होऊ शकत नाहीत हे तुम्हालाही मान्य करावे लागेल. ही योजना गेल्या वर्षीच प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे आणि पुढील तीन वर्षांत तुम्हाला बदल दिसून येईल.एका शहराचे नाव सांगा जे आघाडीवर आहेपुण्यात चांगले काम सुरू आहे. इतरही काही शहरे आहेत. विशेष म्हणजे यानिमित्ताने देशात प्रथमच ५०० शहरांचे सर्वेक्षण होत आहे. त्यामुळे कुठल्या शहराची काय स्थिती आहे हे लक्षात येईल. खरे सांगायचे म्हणजे स्मार्ट शहरांची योजना जाहीर झाली तेव्हा माझ्या मनात किंचित साशंकता होती. परंतु पंतप्रधानांनी मला स्मार्ट शहरांची निवड करताना मानदंडांचे काटेकोर पालन करण्याची सूचना केली होती. या १०० स्मार्ट शहरांनी दीपस्तंभाचे काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. ३५पेक्षा अधिक देश आणि कंपन्यांनी या विषयात रुची दाखविली आहे.