शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कें द्रात आमची भूमिका किंगमेकरचीच, टीआरएसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 05:54 IST

लोकसभा निवडणुकीसाठी एका बाजूला भाजपा तर दुसऱ्या बाजूला अन्य विरोधी पक्ष आहेत.

हैदराबाद - लोकसभा निवडणुकीसाठी एका बाजूला भाजपा तर दुसऱ्या बाजूला अन्य विरोधी पक्ष आहेत. पण, तेलंगणा राष्ट्र समितीसारखे (टीआरएस) प्रादेशिक पक्ष तूर्तास तटस्थ भूमिकेत असून जर सरकार स्थापनेसाठी मोठ्या पक्षाला सहकार्याची गरज लागली तर आपण किंंगमेकरच्या भूमिकेत राहू, असा दावा या पक्षाने केला आहे.टीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, त्यांचे चिरंजीव आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी स्पष्ट केले आहे की, ते बिगर भाजपा, बिगरकाँग्रेसचे सरकार सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एनडीएविरुद्ध काँग्रेस, बसपा- सपा, तृणमूल, भाकपा, डीएमकेसारखे विरोधी पक्ष एकत्र आले असताना टीआरएस त्यांच्यापासून दूरच आहे. टीआरएसच्या सूत्रांनी सांगितले की, प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.टीआरएसच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाला असे वाटते की, भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएच केंद्रात सत्ता स्थापन करू शकते. जर भाजपाने बहुमत मिळवून सरकार स्थापन केले तर ठीक आहे. अन्यथा, टीआरएस कें द्रात सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल. (वृत्तसंस्था)१४ जागा पक्क्या?तेलंगणात अलीकडेच विधानसभा निवडणुका झाल्या. टीआरएसला असा विश्वास आहे की, लोकसभा निवडणुकीत १४ जागांवर आपल्याला विजय मिळेल.एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या हैदराबाद या मतदारसंघातूनही विजय मिळेल असा दावा पक्षकरत आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliticsराजकारण